पोटाला अन्न घालून आत्मा थंड करणारा स्पायडरमन

spidar
स्पायडरमन हा सुपरहिरो अनेक चित्रपट आणि कॉमिक्समधून जगभरात गाजला आहे. अर्थात सुपरहिरो हे कल्पनेतच असू शकतात असा जर आपला समज असेल तर तो बदलायला हवा. कारण युकेच्या बर्मिंहॅममध्येही रोज रात्री असाच स्पायडरमन अवतरतो. मात्र तो सुपरहिरोप्रमाणे गुंडांशी अथवा दुष्टांशी लढत नाही तर भुकेने कळवळलेल्या बेघर लोकांचा शोध घेऊन त्यांना जेवू घालतो आणि त्यांचा आत्मा थंड करतो.

वीस वर्षाचा हा युवक दिवसभर बारटेंडरची नोकरी करतो असे समजते. त्याने आपले नांव गुप्त ठेवले आहे. रात्रीच्या अंधारात तो स्पायडरमन सारखाच पोषाख करून बाहेर पडतो आणि भुकेल्यांचा पोटात दोन घास घालतो. तो म्हणतो, मी कसा पोषाख करतो याच्याशी भुकेल्या माणसाला कांहीच देणेघेणे नसते कारण त्याचे सारे लक्ष अन्नाकडे असते. चार घास पोटात गेले की त्यांचे डोळे भावूक होतात आणि हेच माझ्यासाठी बक्षीस असते. बेघरांच्या प्रश्नांकडे सरकार आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष वेधले जावे यासाठी हा उपक्रम तो राबवित आहे.

Leave a Comment