कडेवर घेऊन बेडवर झोपविणारा रोबो

robo
जपानने रोबो निर्मितीत घेतलेली आघाडी डोळे दिपविणारी आहे. रोजच्या कामात उपयुक्त ठरू शकतील असे कितीतरी प्रकारचे रोबो जपानमध्ये सातत्याने तयार केले जात आहेत. त्यात आता हिमअस्वलाशी साधर्म्य असलेल्या नव्या रोबोची भर पडली आहे. हा रोबो तुम्हाला उचलून कडेवर घेऊ शकतो आणि तुमच्या बेडवर आरामात झोपवू शकतो.

रिकेन इन्स्टिट्यूट आणि सुमितो मोरिका कंपनीने एकत्र येऊन हा रोबो तयार केला आहे. मोठे डोळे असलेला हा रोबो १४० किलो वजनाचा आहे. हा रोबो प्रामुख्याने जपानला भविष्यात भेडसावू शकणारा अडचणी लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. जपानमध्ये जन्मदर अत्यंत कमी झाला आहे मात्र वृद्धांची सध्याच प्रचंड असलेली संख्या भविष्यात आणखी वाढणार आहे. या वृद्धांच्या तसेच अपंगांच्या सेवेसाठी तरूण मनुष्यबळ जपानकडे नाही. त्यामुळे अशा लोकांची काळजी घेऊ शकेल असा रोबो तयार करण्यात आला आहे.

हा रोबो कुणालाही अलगद उचलून बेडवर नेऊन ठेवू शकतो. अगदी व्हिलचेअरमधल्या अपंगांनाही तो अत्यंत हळूवारपणे उचलून बेडवर नेतो. त्यामुळे भविष्यात अशा रोबोंची मागणी वाढणार यात शंका नाही.

Leave a Comment