आता हत्तीही शोधणार स्फोटके

elephant
कुत्र्यांची घाणेंद्रिये म्हणजे नाक अतिशय तीक्ष्ण असते आणि त्यामुळे वासावरून वस्तू शोधणे, सुरूंग शोधणे, चोरांचा तपास लावणे यासारखी कामे कुत्र्यांना प्रशिक्षिण देऊन करून घेतली जातात हे आपल्याला माहिती आहेच. पण दक्षिण आफ्रिकेत याच कामांसाठी हत्तींचाही वापर करण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. हत्तींची घाणेंद्रियेही कुत्र्यांसारखीच तीक्ष्ण असतात शिवाय हत्ती एकदा दिलेला वास लक्षात ठेवतात हे लक्षात आल्यानंतर हत्तींना स्फोटके शोधण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे समजते. अमेरिकेच्या सैन्य शोध कार्यालयाच्या मदतीने हे प्रशिक्षण त्यांना दिले जात आहे.

प्रशिक्षण देणार्‍या अधिकार्‍यांनी सांगितले की हत्तींना काही भांड्यांच्या वास देण्यात आला आणि त्यातील एकात सुरूंग दारूची पट्टी चिकटविली गेली. तेव्हा हत्तीने ते भांडे अचूक ओळखले.वैज्ञानिक स्टीफन म्हणाले की हत्ती आणि कुत्री यांच्यात कोणाची घाणेद्रिये अधिक चांगली हे अद्यापी सिद्ध करता आलेले नाही मात्र कुत्र्यांना स्फोटके ओळखण्याचे प्रशिक्षण सतत द्यावे लागते. हत्ती एकदा प्रशिक्षण दिले की लक्षात ठेवतात असे आढळून आले आहे.

Leave a Comment