करीयर निवडताना….


कॉलेजची आणि उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची निवड करताना बहुतेक मुला मुलींच्या मनात कमालीचा संभ्रम असतोच पण त्यांच्या पालकांच्या मनातही तो असतो. आपल्या मुलाला किंवा मुलीला नेमक्या कोणत्या अभ्यासक्रमाला घालावे हा तर प्रश्‍न त्यांना पडलेला असतोच पण कोणत्या कॉलेजात प्रवेश द्यावा याबाबतही अनेक शंका असतात. आता आता पालक मुला मुलींवर आपले विचार लादेनासे झाले आहेत. त्यांनी आपापला निर्णय घ्यावा अशी मुभा ते द्यायला लागले आहेत. आता जबाबदारी मुलांची आहे. त्यांनी शास्त्रशुद्ध निर्णय घेतला नाही तर त्यांच्या भवितव्यावर काही परिणाम होण्याची शक्यता असते. करीयरच्या बाबतीत आपल्या काही चुकीच्या कल्पना असतात त्या आपण तपासून घेतल्या पाहिजेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अनेक मुलांना एखाद्या महाविद्यालया विषयी भलतेच आकर्षण असते. पण त्या कॉलेजात त्यांच्या आवडीचा विषय नसतो. अशा वेळी ही मुले आवडीचा विषय मिळाला नाही तरी चालेल म्हणून केवळ त्या कॉलेजच्या प्रेमापोटी तिथे प्रवेश घेतात. नंतर त्यांना साक्षात्कार होतो. त्या कॉलेजात ङ्गार काही चांगले नाही, आपल्याला दूरून त्याच्या विषयी आकर्षण निर्माण झाले होते हे त्यांना लक्षात येते. अशा वेळी अभ्यासक्रम आवडत नसूनही पुढे जारी ठेवावा लागतो किंवा आवडीच्या विषयासाठी कॉलेज तरी बदलावे लागते. अशा प्रसंगी कॉलेज बदलावे.

एखादे वर्ष गेले तरी चालेल पण जन्मभर नावडता विषय शिकण्याची आणि त्यात काम करण्याची शिक्षा ङ्गार वाईट असते. आता माहिती तंत्रज्ञान हा विषय सर्वांच्या आवडीचा झाला आहे. या शास्त्रात शिक्षण घेऊन सॉफ्टवेअर इंजिनियर झालो की एकदम लाखाचे पॅकेज ठरलेलेच असा सर्वांचा समज आहे. ते काही अगदीच खोटे नाही पण सॉफ्ट वेअर इंजिनियर होण्यासाठी इंजिनियरिंगला जावे लागते असा समज समाजात ङ्गार दृढ झाला आहे. जी मुले इंजिनियर होतात किंवा आयआयटीला जाऊन बी टेक होतात त्यांनाच आयटी ङ्गील्डमध्ये संधी मिळते असे सर्वांच्याच मनात ठसले आहे. किंबहुना आयटी ही इंजिनियरिंगचीच एक साईड आहे असेच सर्वांच्या मनावर बिंबले आहे. या गैरसमजातून बाहेर येण्याची शक्यता आहे. कला शाखा ही आपण सर्वांनीच टाकावू शाखा ठरवून टाकली आहे. पण आयटी ङ्गील्ड मध्ये करीयर करण्यासाठी कला शाखेचीही पदवी चालते. आयटीमध्ये येण्यास कला, वाणिज्य, विज्ञान अशा कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना संधी आहे. माहिती तंत्रज्ञान हे माहिती देण्याचे तंत्रज्ञान आहे.

कला शाखेचा विद्यार्थी या ङ्गील्ड मध्ये आले तर ते कला शाखेशी संबंधित माहिती या तंत्रज्ञानातून देऊ शकतील. किंबहुना या ङ्गील्डमध्ये अनेकानेक ेशाखांच्या विद्याथ्यार्ंंची गरज आहे. समजा उद्या चारही वेद एका वेबसाईट वर टाकायचे ठरवले आणि त्यासाठी त्यांचे संक्षिप्त रूप करण्याची वेळ आली तर ते काम कला शाखेचाच विद्यार्थी चांगले करू शकेल. आयटी ङ्गील्ड कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना वर्ज्य आहे असे काही नाही. तेव्हा कला शाखेच्या विद्यार्थ्यांनीही माहिती तंत्रज्ञानाकडे वळायला काही हरकत नाही.

भारतातल्या काही अग्रगण्य आयटी कंपन्यांचे सीईओ हे बी. कॉम. आणि एम. ए. झालेले आहेत. असाच एक समज पत्रकारितेबाबत आहे. विज्ञान पदवीधर होऊन पत्रकारितेकडे वळणार्‍या पत्रकारांना अनेक लोक, तुम्ही इकडे कसे वळलात, असा प्रश्‍न विचारत असतात आणि विज्ञान पदवीधर असूनही पत्रकार झाल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करतात. खरे तर त्यात कसलेही आश्‍चर्य नाही. डॉक्टर झालेला वैद्यकीय पदवीधरही पत्रकार होऊ शकतो. पत्रकारिता हा काही कला शाखेशी निगडित असलेला अभ्यासक्रम नाही. असेच गैरसमज इतरही काही अभ्यासक्रमांबाबत निर्माण झाले आहेत. अभियांत्रिकी पदवी मिळवून कलेक्टर झालेले आय.ए.एस. ऑङ्गिसर आता आपल्याला परिचयाचे झाले आहेतच पण बी. टेक. पदवी मिळवून महसूल खात्यात पुरवठा अधिकारी झालेले पदवीधरही परिचयाचे होणार आहेत.

Leave a Comment