इम्रान सरकारचे संतापजनक काम; शीख बांधवांना करतारपूर गुरुद्वाराच्या देखभालीपासून हटवले


इस्लामाबाद – पाकिस्तानतील इम्रान सरकारने करतापूर गुरुद्वारासंदर्भात संतापजनक काम केले आहे. गुरुद्वाराच्या देखभालीचे काम पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून काढून ते एका नव्या संस्थेकडे पाकिस्तानातील इम्रान सरकारने दिले आहे. विशेष म्हणजे एकही शीख सदस्य गुरुद्वाराच्या देखभालीसाठी तयार करण्यात आलेल्या या संस्थेत नाही. आता प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट यूनिटकडे करतारपूर गुरुद्वाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, ज्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट यूनिटला करतारपूर गुरुद्वाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यातील सर्वच्या सर्व ९ सदस्य Evacuee Trust Property Board (ETPB)शी संबंधित आहेत. त्याचबरोबर असेही सांगण्यात येते, की ETPBला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय कंट्रोल करते.

मो. तारिक खानला प्रोजेक्ट मॅनेजमेंट यूनिटचा सीईओ करण्यात आले आहे. करतारपूर गुरुद्वारासंदर्भात पाकिस्तान सरकारने जारी केलेल्या आदेशात व्यापार करण्याची गुरुद्वाराच्या माध्यमाने योजना आहे. प्रोजेक्ट बिझनेस योजनेचाही या आदेशात उल्लेख आहे. अर्थात इम्रान सरकारचा या गुरुद्वारापासून पैसा कमावण्याचा इरादा आहे.

Loading RSS Feed