नखांचे सौंदर्य कसे वाढवावे


नखे ही सुद्धा सौंदर्याचे प्रतिक असतात. म्हणूनच केवळ महिलाच नव्हे तर अनेक पुरुष सुद्धा आपल्या नखांकडे बारकाईने लक्ष देत असतात आणि त्यांचे सौंदर्य वाढविण्याचा प्रयत्न करत असतात. काही लोक नखांना नेहमी घासत असतात. हे घासणे म्हणजे एखाद्या लाकडाला कानशीने घासल्यासारखे असते. त्यामुळे नखे सुंदर होतात. परंतु ती अधिक सुंदर व्हावीत यासाठी घासण्याची दिशा बोटाकडून नखाकडे अशी असावे.

लिंबाचाही उपयोग नखाचे सौंदर्य वाढविण्यास होतो. त्यासाठी एक लिंबू घ्यावे, त्याला भोक पाडावे आणि त्यातून नख आत सरकवावे. आत नखापर्यंत बोट घट्ट बसले की लिंबू फिरवावे. म्हणजे लिंबाने नखाला मालिश केले जाईल आणि नख चकचकीत होईल. खोबरेल तेलाचा वापर करूनही नखाला सुंदर करता येते. त्यासाठी गरम केलेल्या खोबरेल तेलाने नखाला मालीश करावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही