Google Pay ने बदलला लोगो, नव्या लोगोमुळे होऊ नका विचलित


नवी दिल्ली : भारतात लोकप्रिय असलेल्या पेमेंट अ‍ॅप गुगल पेच्या अ‍ॅप आयकॉनमध्ये बदल केला जात असून या अॅपचा नवा लोगो जुन्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असून हा कंपनीच्या थीम कलर बेस्ड आहे. गुगल पे ला भारतात सुरुवातीला तेज या नावाने लाँच करण्यात आले होते. यानंतर त्याचे नामकरण करण्यात आले.

सध्याच्या गुगल पे अ‍ॅपच्या लोगोवर जी आहे आणि यानंतर पे लिहिले आहे. परंतु, नव्या लोगोमध्ये जी आणि पे या दोन्हींचा वापर करण्यात आलेला नाही. गुगल पे चा नवा लोगो मल्टी कलर असून यामध्ये ब्ल्यू, ग्रीन, यलो आणि रेड कलरचा वापर केला गेला आहे. हे कलर्स गुगलच्या ब्रँडिंगमध्ये सुद्धा वापरले जातात. नव्या लागोमध्ये स्मॉल यू आणि एन चा शेप दिला आहे आणि दोन्ही एकमेकांना ओव्हरलॅप करत आहेत. हा लोगो दिसायला थ्रीडी वाटतो आणि पाहून असे वाटत नाही की या लोगोची थीम काय आहे.

भारतातील काही यूजर्सना याचे अपडेट देण्यात आले आहे. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर सुद्धा काही लोकांनी नव्या लोगोला ट्विट केले आहे. नवा लोगो गुगल पेच्या 116.1.9 (बेटा) व्हर्जनसोबत जारी केला जात आहे. गुगल पे च्या फायनल बिल्डसोबत लवकरच कंपनी जारी करेल आणि तुमच्या स्क्रीनवर गुगल पे चा नवा लोगो तुम्हाला दिसेल. पण सध्या याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.