सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अर्णब गोस्वामींच्या पत्नीलाही होऊ शकते अटक


मुंबई – रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अटक केली असून, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. त्यानंतर आता अर्णब गोस्वामी यांच्या पत्नीलाही सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक होण्याची शक्यता असून मुंबई पोलिसांकडून आज अर्णब गोस्वामींच्या पत्नीला कधीही अटक होऊ शकते.

काल अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यासाठी रायगड पोलीस त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी अर्णब गोस्वामी यांच्यासह त्यांच्या पत्नीने रायगड पोलिसांच्या कारवाईला विरोध करून त्यांना धक्काबुक्की केली होती. रायगड पोलिसांच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानावडे यांच्या तक्रारीवरून त्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांना त्यावरूनच अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.