सांग दर्पणा कशी मी दिसते?

smart-mirror
नटण्यामुरडण्याची आवड माणसात नैसर्गिकरित्याच असते. नटणे हा विषय महिला जगताशी अधिक जोडला गेला असला तरी पुरूषही त्यात मागे नसतात फक्त कबुली देण्याचे टाळतात हा अनुभवही सर्वत्र येतो. आपण घालतो त्या कपड्यात कसे दिसतो आहोत याची उत्सुकता प्रत्येकाला असते आणि ते न्याहाळण्यासाठी आरसेही असतात. मात्र दुकानात खरेदी करताना एकाचवेळी अनेक कपडे ट्राय करण्यापेक्षा आपण त्या कपड्यांत कसे दिसतोय याचा व्हर्च्युअल अनुभव देणारा स्मार्ट मिरर – मेमो मी या नावाने इंटेलने आणला आहे.

या मिररला स्मार्ट डिस्प्ले स्क्रीन दिला गेला आहे. त्यामुळे युजर प्रत्यक्षात स्वतःला खरेदी करावयाचे कपडे घातलेले पाहू शकतो. यासाठी ग्राफिक टेक्नॉलॉचीचा वापर केला आहे. एकाचवेळी अनेक आऊटफिट ट्राय करण्याची सुविधा यात युजरला आहे त्यामुळे नक्की कोणता ड्रेस घ्यायचा याची निवड करणे सोयीचे होणार आहे. या आरशात एक कॅमेराही फिट केला आहे. तो युजरला स्कॅन करतो आणि नव्या कपड्यातले हे फोटो दोस्तांशीही शेअर करतो. मोबाईल अॅपच्या मदतीने हे फोटो स्मार्टफोनमध्ये सेव्ह करता येतात. विशेष म्हणजे एकचवेळी दोन वेगळे लूकही युजर पाहू शकतो आणि तुलना करून योग्य ती खरेदी करू शकतो असे कंपनीचे म्हणणे आहे.

Leave a Comment