कसा असावा गर्भवतीचा आहार

pregnancy
आई होणार हे कळलं की स्त्रीचा आनंद गगनात मावेनासा होतो. आपण नव्या जीवाला जन्म देणार या भावनेनेच ती सुखावते, पण त्याच आनंदाबरोबर तिने स्वत:च्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज असते. गर्भावस्था हा स्त्रीच्या आयुष्यातील खूफ महत्वाचा टप्पा असतो. या काळात स्त्रीच्या आरोग्यामध्ये बरेच चढ -उतार होत असतात. पोटात एक नवा जीव वाढत असल्याने गर्भवती स्त्रीने आरोग्याची काळजी घेण्याची गरज असते.

गर्भावस्थेदरम्यान स्त्रीने नेमका कशा प्रकारचा आहार घ्यायला हवा, याबाबत बरेच समज आहेत. एखादा पदार्थ खाल्ला तर बाळावर अमूक परिणाम होईल, असे मानले जाते. बर्‍याच प्रकारच्या भाज्या आणि फळे गर्भवती स्त्रीसाठी वर्ज्य मानली जातात. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला सर्दी, खोकला होण्याची शक्यता असल्याने गर्भवती स्त्रीला ठरावीक पदार्थ खायला दिले जात नाहीत. बाळाच्या शरीरावर पांढरे डाग निर्माण होण्याच्या शंकेने गर्भवती स्त्रीला मासे खाण्याचीही परवानगी नसते. मात्र, या सवार्ंपलीकडे जाऊन स्त्रीचे आणि पोटातील बाळाचे आरोग्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने तिला सकस आणि पौष्टिक आहार देणे गरजेचे असते.
गर्भवती स्त्रीच्या आहारामध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिज पदाथार्ंचा मोठ्या प्रमाणात समावेश असला पाहिजे. गर्भावस्थेच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडची एक गोळी गर्भवती स्त्रीला दररोज देणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रीच्या आहारात वरण, भात, हिरव्या भाज्या, पोळी आणि फळांचा समावेश असायला हवा. सकाळ-संध्याकाळ स्त्रीने दूध पिण्याची आवश्यकता असते. गर्भस्थ बाळाची वाढ होत असताना गर्भवती स्त्रीने पिरपूर्ण आहार घेण्याची गरज असते. गर्भवती महिलेचे वजन तिच्या नेहमीच्या वजनापेक्षा पुरेसे जास्त असायला हवे, असा सल्ला डॉक्टर देतात. बाळंतपणानंतर नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेऊन महिलेचे वजन पूर्वपदावर येऊ शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment