हिरवी खारी शंकरपाळी

shankar
मुलांना सतत कांही तरी नवीन खायला हवे असते. घरच्या घरी करता येणारी अणि आठ पंधरा दिवस टिकणारी ही शंकरपाळी अवश्य करून बघा.

साहित्य- मैदा पाव किलो, (मैदा नको असल्यास कणीकही घेता येईल.), कोथिबीर वाटून पाव वाटी प्युरी, बेसन अर्धी वाटी, तेल ३ ते ४ मोठे चमचे, जिरे, काळी मिरी पावडर,लाल तिखट, असल्यास कलौंजी प्रत्येकी अर्धा चमचा, बारीक रवा दोन चमचे, मीठ चवीनुसार, तीळ १ चमचा
कृती- प्रथम तसराळ्यात मैदा, रवा,बेसन, जिरे, तिखट, मीठ, तीळ, कलौंजी, काळी मिरी पावडर सर्व एकत्र करून घ्या. नंतर त्यात ३ ते ४ चमचे तेल घालून चांगले मिक्स करा. त्यात कोथिबीर प्युरी घाला आणि पीठ घट्ट मळा. अर्धा तास झाकून ठेवा.अर्ध्या तासानंतर पीठ पुन्हा चांगले मळा. पोळीच्या आकाराचा गोळा घेऊन पोलपाटावर साधारण पातळ लाटा. आवडीच्या आकाराची शंकरपाळी कापा. तेल गरम झाल्यानंतर शंकरपाळी सोनेरी रंगावर तळून काढा. तेल मध्यम आचेवरच ठेवा आणि शंकरपाळी तळा म्हणजे ती कुरकुरीत होतात.

शंकरपाळी चांगली गार झाल्यावर डब्यात भरा. खायला देताना वरून चाट मसाला घातला तर आणखी चांगली लागतात. लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही चहा बरोबर देता येतात.

Leave a Comment