सुकविलेल्या आंब्याचे सेवन करेल रक्तशर्करा नियंत्रित

mango
रक्तात साखरेची पातळी वाढणे म्हणजे मधुमेहाच्या आगमनाची चाहूल लागणे. आंबा हे फळ म्हणजे साखरेचे आगरच म्हणायला हवे. आंबा आवडतो सगळ्यांनाच पण ज्यांना रक्तातील साखरेची पातळी वाढून चालणार नाही त्यांच्यासाठी आंबा वर्ज्यच. मात्र आता अशा व्यक्तींसाठी एक चांगली खबर संशोधकांनी दिली आहे.

या संशोधकानी केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की रक्तात साखरेची पातळी अधिक असलेल्या लोकांनी रोज १० ग्रॅम सुकविलेला आंबा खाल्ला तर त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. १० ग्रॅम आंबा म्हणजे कांहीच नाही असा समज होण्याची शक्यता आहेच. पण संशोधक सांगतात की सुकविलेला १० ग्रॅम आंबा हा एका ताज्या आंब्याच्या बरोबर आहे. त्यामुळे ज्यांचे वजन जास्त आहे असे युवकही आंबा सेवन करू शकतील. त्यांच्या रक्तातील साखर वाढणार नाहीच पण उलट वजन वाढीचा धोकाही कमी होईल.

न्यूट्रीशन अॅन्ड मेटॅबोलिक इनसाईट जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध केले गेले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment