युवा शेतकरी वर्गासाठी बनले क्रिकेट स्टेडियम

फोटो साभार भास्कर

भारत क्रिकेटवेडा देश मानला जातो. येथे प्रत्येकाला क्रिकेट खेळायचे असते मग ते दिल्लीतील असो वा गल्लीतील. देशाची बहुसंख्य जनता ज्या कृषीउद्योगात कार्यरत आहे असे शेतकरी क्रिकेटला अपवाद नाहीत. महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी गावात शेतकरी बंधुंसाठी क्रिकेट स्टेडियम बांधले गेले आहे. दिवसभराच्या मेहनतीनंतर रात्री हे बांधव क्रिकेट खेळण्याचा आनंद त्यामुळे लुटू शकणार आहेत.

अंकुशराव टोपे क्रीडा संकुल असे या मैदानाचे नामकरण केले गेले आहे. इंजिनीअर दिगंबर घोंगरे या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले, या सुविधेमुळे युवा शेतकऱ्यांची क्रिकेट मधील प्रतिभा समोर येण्यास मदत होणार आहे. येथे दिवसभर शेताची कामे केल्यावर रात्री युवा शेतकरी क्रिकेटचा आनंद लुटू शकतील. १५८ मीटर व्यास असलेले हे स्टेडियम सरकारी जमिनीवर बांधले गेले आहे. बाजूला ६०० मीटरचा ट्रॅक बांधला आहे तेथे चालणे, पळणे असा व्यायाम करता येणार आहे. स्टेडियम मध्ये ६ लाईट खांब असून त्यावर प्रत्येकी १४ फ्लड लाईट्स आहेत.

आगामी काळात कुस्ती व अन्य खेळांसाठी मैदान तयार करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे घोंगरे यांनी सांगितले.