छेडछाडीपासून युवतींना संरक्षण देणार लिपस्टिक

kipstikलिपस्टिक, छेडछाड
वाराणसी- देशातील युवती आणि महिलांना पुरूषांकडून केल्या जात असलेल्या छेडछाडीपासून संरक्षण देऊ शकेल अशी लिपस्टीक वाराणसीतील रोमा या मुलीने तयार केली आहे. छेडछाडीसारखी घटना घडत असेल तर ही लिपस्टीक संबंधिताला २०० व्होल्टचा झटका देऊ शकेलच पण कुठल्या ठिकाणी हा प्रकार सुरू आहे ते लोकेशनही फिड केलेल्या नंबरवर दाखवू शकेल. रोमा संगणक शास्त्र पदवीच्या तिसर्‍या वर्षात शिकत असून तिचे वडील पानविक्रेते आहेत.

रोमाच्या म्हणण्यानुसार तिने तयार केलेली लिपस्टीक मुली महिलांचे सौंदर्य वाढवेलच पण त्यांना संरक्षणही देईल. या लिपस्टीकमध्ये रोमाने असे एक डिव्हाईस बसविले आहे, की ज्याला या लिपस्टीकचा स्पर्श होईल त्याला जोरदार विजेचा झटका बसेल. परिणामी या धक्क्यातून छेडछाड करणारा सावरेपर्यंत संबंधित तरूणी, महिला स्वतःच्या बचावासाठी कांही हालचाल करू शकतील. याच लिपस्टीकमध्ये न दिसेल अशी जीपीएस यंत्रणाही आहे. त्यासाठी एक बटण आहे. ते दाबले की छेडछाड करणारा नक्की कोठे आहे याची माहिती या लिपस्टीकमध्ये फिट केलेल्या डिव्हाईस मध्ये फिड केलेल्या नंबरवर रिंग जाणार आहे.

Leave a Comment