किंग कोहली झाला ३२ वर्षांचा

फोटो साभार टाईम्स नेटवर्क

टीम इंडियाचा कप्तान विराट कोहलीचे क्रिकेट कौशल्य आणि कर्तृत्व आज जगासमोर आहे. क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात धमाल करणाऱ्या विराटला म्हणूनच जागतिक क्रिकेट मध्ये ‘किंग कोहली’ नावाने ओळखले जाते. किंग कोहली ५ नोव्हेंबरला त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या युएई मध्ये आयपीएल खेळत असलेल्या कोहलीसाठी हा महिना आणखी खास बनला आहे.

दिल्लीत ५ नोव्हेंबर १९८८ ला जन्म आणि तेथेच क्रिकेटची सुरवात करणारा विराट प्रथमपासून आक्रमक आहेच पण पूर्ण जोशात त्याने अनेकदा मैदानावर मर्यादा सोडल्याने सुरवातीला तो बॅड बॉय म्हणून ओळखला जात होता. टीम इंडियाची कप्तानी मिळाल्यापासून मात्र त्याचे वर्तन एकदम सुधारले असून अतिशय जबाबदारीने वागून आणि खिलाडू वृत्तीने तो जंटलमन म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे.

विराटच्या घरात लवकरच नवीन पाहुणा येणार असल्यामुळे त्याची जबाबदारी आता आणखी वाढणार आहे.