डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने काश्मीरला दाखवले पाकिस्तानमध्ये !


न्यूयॉर्क : जगातील महासत्ता म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी सध्या निवडणूक सुरु आहे. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा बाजी मारणार की, डेमोक्रेटचे जो बायडेन जिंकणार याकडे संपूर्ण जगाचे लक्षे लागून राहिले आहे. याच दरम्यान भारताचा वादग्रस्त नकाशा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने ट्विट केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकांच्या रणधुमाळी दरम्यान भारताचा वादग्रस्त नकाशा ट्विट केला आहे. ट्रम्प समर्थक आणि बायडन समर्थक देशांना डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरने ट्विट करत लाल आणि निळ्या रंगामध्ये दाखवले आहे. ज्यामध्ये काश्मीरला त्यांनी पाकिस्तानचा भाग असल्याचे दाखवले आहे. त्याचबरोबर भारतालाही जो बायडन यांना समर्थन देणारा देश म्हणून त्यांनी दाखवले आहे.


दरम्यान, जो नकाशा ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने शेअर केला आहे. त्यामध्ये संपूर्ण जगाचा नकाशा दोन रंगांमध्ये दाखवला आहे. आपल्या वडिलांना समर्थन देणाऱ्या देशांना समोर आलेल्या नकाशामध्ये ट्रम्प यांच्या मुलाने लाल रंगाने आणि बायडन यांना समर्थन देणाऱ्या देशांना निळ्या रंगाने दाखवले आहे. भारतासोबत या नकाशात चीन, मॅक्सिको आणि लायबेरिया यांना बायडन यांना समर्थन देणारे देश म्हणून दाखवण्यात आले आहे.

Loading RSS Feed