अर्णबच्या वकिलाचा पोलिसांवर गंभीर आरोप


मुंबई – आज सकाळी रायगड पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील त्यांच्या घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. अर्णब गोस्वामी यांना यावेळी पोलिसाकंडून मारहाण झाल्याचे स्वतः अर्णब गोस्वामी यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर पोलिसांवर त्यांचे वकील गौरव पारकर यांनी देखील गंभीर आरोप केला आहे.

अटकेबद्दलची माहिती अर्णब गोस्वामी यांच्या पत्नीला देखील दिली गेलेली नव्हती. दोन पोलिसांकडून त्यांना मारहाण झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धक्का दिला गेला व त्यांचे घर तीन तासांसाठी बंद करण्यात आले. त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झालेली आहे आणि पोलिसांकडून ज्या ठिकाणी दुखापत आहे, तिथे बांधलेली पट्टी देखील काढण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप अर्णब गोस्वामीच्या वकिलाकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर अर्णब गोस्वामींच्या हाताला व पाठीवर मारले, त्यांना त्रास दिला आहे. त्यांना अटकेवेळी बेल्टने पकडले होते. त्यांच्या पाठीवर देखील जखम झाल्याचा आरोप त्यांच्या वकीलाने केला आहे.

Loading RSS Feed