डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी…

dengue
सध्या मुंबईसह महाराष्ट्रात डेंग्यूच्या विकाराने थैमान घातलेला आहे. डेंग्यूच्या बाबतीत दोन गोष्टी मोठ्या धोकादायक आहेत. एक म्हणजे तो झाला असल्यास झाल्याचे कळत नाही. रक्ताची तपासणी करण्यासाठी रक्ताचे नमुने पुण्याला पाठवावे लागतात आणि महिनाभराने हा आजार डेंग्यूचा होता की नाही हे कळते. दुसरी विचित्र गोष्ट म्हणजे डेंग्यू झालेलेच कळत नाही आणि कळले तरी डेंग्यू दुरुस्त होण्यासाठी औषध नाही. डेंग्यू झालेल्या रुग्णाला थंडी वाजून ताप येतो आणि डॉक्टर या लक्षणांवर इलाज करतात. कारण आजारावर औषध नाही.

मात्र डेंग्यूच्या बाबतीत एक गोष्ट चांगली आहे की, तो होऊ नये म्हणून काही साध्या उपाययोजना केल्या तरी त्याला आपल्यापासून सहजपणे दूर ठेवता येते. तेव्हा डेंग्यू होऊन नंतर त्याच्या इलाजाची चर्चा करण्यापेक्षा तो होण्याच्या आधीच तो होऊ नये म्हणून काही उपाय केलेले बरे. डेंग्यूचा डास दिवसा चावतो आणि तो घराच्या आत साठलेल्या पाण्यात निर्माण होतो. तेव्हा आपल्या घरामधल्या जुन्या भांड्यात, घराशेजारच्या खोलगट भागात हा डास निर्माणच होऊ नये याची काळजी घेतली की, डेंग्यूपासून चांगलेच संरक्षण मिळते.

घरात डास होऊ नयेत म्हणून उपाय योजावेत. तसा संध्याकाळच्या वेळी सुद्धा त्यांनी घरात प्रवेश करू नयेत यासाठी दक्षता घ्यावी. घराची दारे बंद ठेवावीत आणि खिडक्यांना जाळीबंद करावेत. डासाला मारणारे मॉस्न्युटो रिटेलंट घरात लावलेले असावेत. घरात असताना किंवा बाहेर जाताना सुद्धा शक्यतो लांब कपडे घालावेत. शरीराचे कोणतेही भाग फार उघडे राहू नयेत याची काळजी घ्यावी. घराच्या समोर तुळशीचे झाड अवश्य लावावे आणि काही ना काही निमित्ताने घरात कापूर जाळावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment