फोटो साभार स्पोर्ट्स क्रेझी
कानपूर येथील ग्रीन पार्क मैदानावर जानेवारी २०२१ मध्ये रणजी स्पर्धा घेण्याची तयारी बीसीसीआय कडून केली गेल्याचे समजते. दरम्यान करोना संक्रमण लक्षात घेऊन येथेही सर्व खेळाडू व अन्य स्टाफसाठी बायो बबलची तयारी पूर्ण केली गेली आहे. कोविड मुळे क्रिकेट मध्ये पुष्कळ बदल केले गेले आहेत त्याचा परिणाम कानपूर येथे होणाऱ्या रणजी स्पर्धेवरही पडला आहे.
ग्रीनपार्क मैदानावर खेळाडू सामन्याअगोदर किंवा सामन्यानंतर बायोबबल मध्येच राहतील. म्हणजे बाहेरच्या कुणालाही ते भेटू शकणार नाहीत. खेळणारी टीम, सपोर्ट स्टाफ व अन्य क्रिकेटर सुद्धा बायोबबल मध्ये असतील. त्यांना कमीत कमी प्रवास करावा लागेल याची काळजी घेतली जाणार आहे. मैदानावर बाहेरच्या कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन कडून मिळालेल्या माहितीनुसार ग्रीन पार्क बरोबर कमला क्लब मध्येही बायोबबल वातावरण असेल. करोना टेस्ट करून बायो बबल मध्ये एकदा प्रवेश दिला की कोणत्याही कारणाने कुणालाही बाहेर जाता येणार नाही. अगदी वैद्यकीय टीम साठी सुद्धा हाच नियम असेल असे समजते.