अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीवर १ अब्ज पौंडाचा सट्टा?

अमेरिकन अध्यक्षपद निवडणुकीत ३ नोव्हेंबरला शेवटचे मतदान झाल्यावर आता निकालाची प्रतीक्षा आहे. डेमोक्रॅटिकचे जो बिडेन आणि रिपब्लिकनचे डोनल्ड ट्रम्प यांच्यात संधी कुणाला याच्यावर अनेक तर्क वितर्क केले जात आहेत आणि त्याला सट्टेबाज सुद्धा अपवाद राहिलेले नाहीत. वास्तविक येथे सट्टा बंदी आहे मात्र तरीही प्रचंड मोठ्या आकड्याचा सट्टा येथे लागला असल्याचे वृत्त आहे.

पूर्वीही राष्ट्रपती निवडणुकीत जो बिडेन यांच्यावर १० लाख पौंडाचा सट्टा लागला होता असे सांगितले जात आहे. ब्रिटीश बेटिंग कंपनी लाईब्रोक्सचे प्रमुख मॅथ्यु शॅडिक यांच्या म्हणण्याप्रमाणे या वर्षी सट्टा लावण्याचे रेकॉर्ड झाले आहे. सट्टेबाजांनी चढाओढीने यात उडी घेतली आहे. निवडणुकीच्या अखेरच्या क्षणापर्यंत ही रक्कम १ अब्ज पौंड असेल असे ते म्हणाले.

अर्थात यात सट्टेबाजांची पहिली पसंती जो बिडेन यांना असून त्यामुळे त्यांच्यावर जास्त रक्कम लागली आहे. अर्थात गेल्या काही दिवसात ट्रम्प पुन्हा जिंकण्याची उमेद वाढली असल्याचेही दिसून येत आहे. रॉयटरच्या बातमीनुसार २४ टक्के लोकांना मतदानानंतर लगेच राष्ट्राध्यक्ष नावाची घोषणा होईल असे वाटते आहे तर ३५ टक्के लोकांनी ५ नोव्हेंबर नंतर निकाल जाहीर होईल असे म्हटले आहे. बिडेन जिंकणार यावर ६५ टक्के सट्टा लागला आहे तर डोनल्ड यांच्यासाठी ३५ टक्के सट्टा लागला आहे. बिडेन जिंकले तर सट्टेबाजांना १.५४ दशलक्ष पौंड मिळतील.