प्रत्येक घरात नळाने पिण्याचे पाणी पुरविणारे पाहिले राज्य ठरले गोवा

फोटो साभार स्टेट्समन

केंद्राने आणलेल्या घरोघरी पिण्याचे पाणी नळाने पुरविणाऱ्या ‘जल जीवन मिशन’ योजनेत आत्तापर्यंत ५ कोटी ७५ लाख घरांना नळाचे पाणी कनेक्शन देण्याचे काम पूर्ण झाले असल्याचे जलमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी जाहीर केले असून या योजनेत घरोघरी पिण्याच्या पाण्याचे नळ देणारे गोवा देशातील पाहिले राज्य बनल्याचे समजते. या संदर्भात मंगळवारी झालेल्या बैठकीत पश्चिम बंगाल सोडून देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री व सचिव सहभागी झाले होते.

गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले केंद्राने ऑगस्ट २०१९ मध्ये जाहीर केलेली ही योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उदिष्ट ठेवले गेले आहे. योजना जाहीर झाल्यावर लगेचच देशात करोनाचा उद्रेक झाला मात्र तरीही या १४ महिन्यात २ कोटी ५५ लाख नवी कनेक्शन दिली गेली आहेत. या योजनेवर एकूण ३ लाख ६० हजार कोटी खर्च केले जाणार आहेत त्यातील २.०८ लाख कोटी केंद्र देणार आहे.

या योजनेअंतर्गत गोवा सरकारने राज्यातील सर्व १८ जिल्हे आणि २९७६६ ग्रामपंचायतीमधील सर्व ५३५०५ गावांना नळाने पिण्याचे पाणी पुरवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. अर्थात नळातून दिल्या जाणाऱ्या पाण्याची वेळोवेळी गुणवत्ता तपासणी करणे राज्यांना बंधनकारक केले गेले आहे.