जसा मूड तसे चालणे

think
‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ असे म्हटले जाते. याचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे जो माणूस जे बोलतो तसे वर्तन करतोच असे नाही. दुसर्‍याला सद्वर्तनाचा उपदेश करणारे लोक स्वत: तसे वर्तन करत नाहीत. मात्र काही लोक लोकांना जसा उपदेश करतात तसेच वागतात म्हणून तुकाराम महाराजांनी ‘बोले तैसा चाले’ असे म्हटले आहे. यातला चाले हा शब्द पायांनी चालण्याशी संबंधित नाही तर चाले याचा अर्थ चालचलणूक म्हणजे वागणे असा आहे. मात्र काही लोकांनी चाले याचा अर्थ पायांनी चालतो असा करून काही श्‍लेष केले आहेत.

जो जसा बोलतो तसा चालतो, त्याच्यासाठी बोले तैैसा चाले अशी उक्ती विनोदाने वापरली जाते. दारूड्या माणूस अडखळत बोलतो आणि अडखळतच चालतो. म्हणजे जसा बोलतो तसाच चालतो. माणसाचे चालणे कसे असावे हे त्याच्या मन:स्थितीवरून ठरत असते. आनंदी माणूस पंजावर उड्या मारत चालतो. रागीट माणूस दणादण पाय आपटत चालतो. पायांची ही शैली त्याच्या मन:स्थितीचे दर्शन घडवते. याचा उलटा अर्थ आपण घेऊ शकतो. पाय आपटत चालणारा माणूस रागात आहे असे समजावे आणि उड्या मारत चालणारा माणूस आनंदात आहे असे समजावे.

केवळ पायावरच नव्हे तर खांदे, मान, पाठ या सगळ्यांची अवस्था चालताना जशी असते तशी ती त्याच्या मन:स्थितीवर अवलंबून असते. निराश झालेला माणूस किंवा कायमच नैराश्यवादी असणारा माणूस खांदे पाडून चालतो. अतीशय घाईला आलेला माणूस भरभर हात हलवत चालतो. त्या मानाने निवांत असलेला माणूस हातांच्या हालचाली सावकाशही करतो आणि हात फार लांबवर हलवतही नाही. कॅनडातल्या काही मानसशास्त्रज्ञांनी माणसाचे चालणे आणि त्याची मन:स्थिती यांचा संबंध असल्याचे अनेक प्रयोगातून सिद्ध करून दिले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment