खोबरेल तेलाचे सौंदर्यप्रसाधनातील उपयोग

coconut-oil
आरोग्यासाठी खाद्यतेले कोणती वापरावीत याचा सल्ला देताना डॉक्टर मंडळी खोबरेल तेल अजिबात न खाण्याचा सल्ला देत असतात. कारण खोबरेल तेलात चरबीचे प्रमाण जास्त असते. ते तेल सर्वसामान्य तापमानाला घट्ट होते, म्हणजेच शरीरात ते साचू शकते. असे घट्ट होणारे तेल खाण्यासाठी वापरू नये. त्यासाठी वनस्पती तूप सुद्धा टाळले पाहिजे. खोबरेल तेल खाण्यासाठी वर्ज्य असले तरी सौंदर्य प्रसाधन म्हणून त्याचा चांगला उपयोग होतो. दक्षिण भारतात खोबरेल तेल खाण्यासाठी सरसकट वापरले जाते. मात्र त्याचबरोबर पूर्ण देशभर या तेलाचा केसाला लावण्यासाठी मोठाच वापर होत असतो.

डोक्याला आणि शरीराला मालीश करण्यासाठी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या फेस पॅक्स्मध्ये खोबरेल तेल वापरले जात असते. केसात होणारा कोंडा खोबरेल तेल चोळून लावल्याने कमी होतोे. त्याशिवाय केस खाजणे आणि केस गळणे याही समस्या खोबरेल तेलाने सुटतात. परंतु यासाठी तेल चोळून लावणे गरजेचे आहे. दीपिका पदुकोण, करीना कपूर या चित्रपट तारकांनी आपल्या उत्तम केसांचे श्रेय खोबरेल तेलाला दिले आहे. खोबरेल तेलाचा वापर करतानाच त्यात काही द्रव्ये वापरली तर केस चमकतात.

खोबरेल तेल आणि ऑलिव्ह ऑईल यांचे समप्रमाणात मिश्रण करून ते गरम करावे आणि ते कोमट असताना त्याच्या साह्याने केसांना मसाज करावा. एक तासभर केसांवर शोवर टोपी घालून ते झाकावेत. एक तासानंतर हलका हर्बल शॉम्पू घेऊन त्यांनी केस धुवावेत आणि नंतर कंडिशन लावावा त्याचे केस उत्तम चमकतात. केस गळण्यावर सुद्धा एक पॅक वापरता येतो. १०० मि.ली. खोबरेल तेल आणि मेथीची पावडर, आवळा पावडर आणि कडीपाला यांचे मिश्रण करावेत. ते आठवड्यातून एकदा वापरावे आणि केस धुवावेत. त्यामुळे ते काळे राहतात.

खोबरेल तेलाने डोक्याला मालीश केल्यास डोळ्यावरही चांगला परिणाम होतो. गालही चमकदार होतात. उन्हात फिरल्याने चेहरा काळा झाला असेल तर त्यावर हलक्या हाताने खोबरेल तेल चोळावे. त्याचा काळपटपणा कमी होतो. ज्याची त्वचा कोरडी असेल त्यांनी आठवड्यातून एकदा खोबरेल तेलाचा फुल्ल बॉडी मसाज करावा. त्यामुळे त्वचा निरोगी होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment