कुरुप टाळण्याचे सोपे उपाय

skin-care
हिवाळा आला की, आरोग्याचे रक्षण करण्याबाबत काही सूचना दिल्या जातात. साधारणत: केस आणि त्वचा यांच्यावर हिवाळ्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे हिवाळा आला, त्वचा सांभाळा असा सल्ला दिला जातो. परंतु तळपायावर हिवाळ्याचे काही वेगळे परिणामही होत असतात. विशेषत: कॉर्न किंवा कुरुप होणे हा एक परिणाम सर्वांनाच जाणवतो. तळपायाची कातडी तडकून त्यावर भेगा पडल्या की, त्यावर आपण उपाय करतो. परंतु कॉर्नवर मात्र काहीच उपाय नाही असे समजून आपण त्यांना तसेच ठेवतो. त्याचा कसलाही त्रास आपल्याला होत नाही. त्यामुळे तर आपण त्यांच्याबाबतीत अगदी बिनघोर असतो.

या कॉर्नस्चा सुरुवातीला आणि बरेच दिवस त्रास झाला नाही तरी पुढे पुढे ते त्रासदायक ठरू शकतात. अशा प्रकारचे कॉर्नस् म्हणजे त्वचेच्या आतील मेलेल्या पेशींचे गाठोडे असते आणि त्या पेशी मेलेल्या असल्यामुळे आपल्याला त्रास होत नसतो. परंतु ही अवस्था फार दिवस तशीच राहिली तर मात्र कॉर्नस्च्या जागेवर चालताना वेदना व्हायला लागतात.

नवा बूट चावतो आणि त्यातूनही अशाच प्रकारचे कॉर्नस् निर्माण होतात. काही काही वेळेला हाताला घट्टे पडतात. या सर्वांवर उपाय आहेत. त्यातला पहिला उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी गरम पाण्याने पाय धुणे. हे पाय धुताना ऍन्टी बायोटिक साबण वापरावे. अशा प्रकारच्या घटट्यावर एरंडेल तेल चोळावे, त्यामुळेही घट्टे कमी होतात. घट्ट्यावर व्हिनेगारमध्ये भिजवलेल्या कापसाचे बोळे ठेवून ते रात्रभर बांधून ठेवावेत. घट्टे मऊ होतात आणि ते सहज काढून टाकता येतात. पाय सतत ओले ठेवणे हा एक उपाय असतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फार घट्ट बूट वापरू नयेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment