बालपणातील लठ्ठपणा गंभीर समस्या

fat
लहान वयातील लठ्ठपणा ही अमेरिकेसह सर्वच संपन्न देशातील एक गंभीर समस्या ठरली आहे. अमेरिकेत तर प्रत्येक पाच मुलामागे एक मुलगा अती लठ्ठपणाचा शिकार झालेला आहे आणि अशा मुलांची संख्या वरचेवर वाढत चालली आहे. या मुलांंच्या पालकांना आपले मूल म्हणजे मुलगा किंवा मुलगी हे जाडजूड असली तरी तिच्या जाडीची समस्या जाणवत नाही. उलट आपला मुलगा किंवा मुलगी छान जाड आहे याचे त्यांना कौतुक वाटते. परंतु लहान मुलातील या जाडीमुळे कमी वयातच रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार वाढण्याची शक्यता आहे.

या मुलांमध्ये मानसिक नैराश्य फार लवकर जागे होते आणि त्यांचा आत्मविश्‍वास कमी होऊन प्रगती रोखली जाते. अनारोग्यकारक खाणे, शारीरिक हालचालींना आलेली मर्यादा, त्याचबरोबर खेळायला न जाणे ही या जाडपणाची मुख्य कारणे आहेत. त्याशिवाय आनुवंशिकतेनेही लठ्ठपणा येतो आणि शरीरातल्या काही स्रावांचाही परिणाम होतो.

अशाप्रकारचा जाडपणा आपल्या मुलाच्या नशिबी येऊ नये यासाठी काही पथ्ये पाळण्याची गरज आहे आणि ती पथ्ये कोणती हे या जाडपणामागची कारणे पाहिल्यानंतर लक्षात येते. मुख्य म्हणजे पालकांनी मुलांची जीवनपद्धती बदलली पाहिजे. सातत्याने खात राहणे, जादा आहार, पोषण द्रव्ये नसलेला आहार आणि सातत्याने संगणकासमोर बसणे या गोष्टींपासून त्याला दूर ठेवले पाहिजे. विशेष म्हणजे त्याचे वजन वारंवार केले पाहिजे. वजन वाढत असल्यास ताबडतोब त्याची दखल घेतली पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment