नेत्र रोग तज्ञ

डोळ्यांच्या विकारांवर इलाज करणारी विद्या शाखा म्हणजे ऑप्टोमेट्री. ऑफ्थॅल्मालॉजी हीही एक अशीच शाखा. या दोन्ही शाखांचे शिक्षण घेणारे डॉक्टरच असतात. पण या ऑप्टोमेट्री या शाखेची पदवी घेणारांना ऑफ्थॅल्मालॉजीस्ट प्रमाणे डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याचे शिक्षण दिलेले नसते. या दोन्हीतला हा फरक महत्त्वाचा आहे. ऑप्टोमेट्रीचा अभ्यास पूर्ण करणारा डोळ्यांच्या सर्व विकारांवर प्राथमिक इलाज करू शकतो. जगात ऑप्टोमेट्री या अभ्यासक्रमाला फार महत्त्व आहे कारण ऑप्टोमेट्री करणारा डॉक्टर डोळ्यांच्या सर्व लहान सहान आजारांवर आणि तक्रारींवर इलाज करू शकतो. दृष्टीतले दोष, चष्मा, लेसर किरणांच्या साह्याने केले जाणारे सर्व इलाज हे त्याच्या अखत्यारीत येतात. लेन्सेस बसवण्यासारखी कामे ही ते करतात. तो डोळ्याची शस्त्रक्रिया करू शकत नाही पण डोळ्यात काही गेल्यास ते काढू शकतो.

जगात बहुतेक ठिकाणी ऑप्टोमेट्रीचा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे. भारतात या डॉक्टरांच्या कामाला आणखी काही मर्यादा आहेत. म्हणून त्याला डोळ्यांची प्राथमिक काळजी घेणारा आगळा वेगळा नेत्रतज्ञ म्हटले जाते. चेन्नईच्या  एलीट स्कूल ऑफ ऑप्टोमेट्री (पत्ता सेन्ट थॉमस माउंट चेन्नई) या संस्थेतला विषयातला अभ्यासक्रम प्रतिष्ठेचा मानला जातो. हा बारावी नंतरचा चार वर्षांचा बी.एस. ऑप्टोमेट्री असा पदवी अभ्यासक्रम आहे. हे कॉलेज मेडिकल रिसर्च फौंडेंशन या संस्थेतर्फे चालवले जाते. त्यासाठी या संस्थेने बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी अँड सायन्स, (बीआयटीएस) पिलानी या जगप्रसिद्ध संस्थेचे सहकार्य घेतलेले आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षे चेन्नईच्या संस्थेत शिक्षण दिले जाते आणि शेवटच्या वर्षाचे शिक्षण तसेच प्रात्यक्षिक ज्ञान त्यांना शंकरा नेत्रालय या डोळ्यांच्या दवाखान्यात दिले जाते. एलीट स्कूल ही हा अभ्यासक्रम देणारी देशातली पहिली संस्था आहे. हा अभ्यासक्रम करणारांना देशात फार चांगली संधी आहे. कारण हे क्षेत्र फार विकसित होणारे आणि वेगाने प्रगती करणारे आहे. या पदवीधरांना नोकर्‍या तर मिळतातच पण खाजगी व्यवसाय करण्याचीही संधी आहे. लोकांचे डोळ्यांचे अनेक प्रश्‍न असतात आणि ते सगळे काही शस्त्रक्रियेचे नसतात. त्यामुळे या लोकांचा व्यवसाय चांगला चालतो.

हा अभ्यासक्रम डॉ. डी.वाय.पाटील इन्स्टिटयूट ऑफ ऑप्टोमेट्री अँड व्हिज्युअल सायन्स पुणे याही संस्थेत आहे. पत्ता- संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे असा आहे. फोन क्रमांक ०९४२२३०८४४४. इ.मेल
www.dypatilOptometry.com असा आहे. यू अँड आय ऑप्टीशियन्स अँड आप्टोमेट्री क्लिनिक, १, गुगल रिव्ह्यू, शॉप नंबर ३, व्यंकटेश अपार्टमंट सहकार नगर पुणे.(फोन ०२० २४२१ ९४४९) येथेही हा कोर्स आहे. इ. मेल पत्ता   
maps.google.co.in असा आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment