डायनॉसोरही होते दातदुखीने त्रस्त

चीन, कॅनडा आणि यूएसमधील संशोधकांनी सिनॉसॉरस या डायनॉसॉरनाही दातदुखीचा त्रास होता आणि दातदुखीचा त्रास असणारे ते कदाचित पहिले सरपटणारे प्राणी असावेत असा अंदाज या जातीच्या डायनॉसॉरसच्या जबड्याच्या संशोधनातून काढला आहे. ही प्रजाती सुमारे दोन कोटी वर्षांपूर्वी नामशेष झाली आहे.

संशोधकांना या नामशेष झालेल्या प्रजातीतील सिनॉसॉरसच्या जबडयाचे हाड उत्खनातत सापडले होते.ते सध्या डायनॉसॉस संग्रहालयात जतन करण्यात आले आहे. मात्र जबड्याचे एक्स रे ने परिक्षण केले गेले तेव्हा चायनीज संशोधकांना या प्राण्याला दातदुखीचा त्रास झाला असावा असे लक्षात आले. मांसाहारी डायनॉसॉरचे दात पडणे हे नवल नसले तरी या जातीच्या प्राण्याचा दात पडला नव्हता तर त्याच्या हिरड्यांनाही कांही नुकसान पोहोचल्याने दात त्यातून निघाला होता आणि कांही कालावधीनंतर ही दात पडलेली जागा किवा पोकळी पूर्ण भरूनही आली होती असे आढळले.

विशेष म्हणजे दात असलेल्या अन्य हाडांना वाळवी लागल्याच्या खुणा दिसल्या मात्र भरून आलेल्या पोकळीत वाळवी आढळली नाही. या जातीच्या डायनॉसॉरना सरासरी १३ ते १४ दात असल्याचे समजले होते मात्र या प्राण्याचे दोन दात पडले होते व ते हिरड्यांच्या दुखण्यामुळेच पडले असावेत असा अंदाज संशोधकांनी लावला.

Leave a Comment