साबुदाण्याचे कुरकुरीत वडे

sabudana-vada
नऊ दिवसांच्या उपवासात बरेचवेळा उकडलेला बटाटा, शिजलेले वरी तांदूळ शिल्लक राहतात.अगदी भिजलेला साबुदाणाही शिल्लक राहतो. यावेळी करण्यासाठी साबुदाणे वडे हा उत्तम पदार्थ ठरतो. विशेष म्हणजे हे वडे सहा सात दिवस चांगले राहतात.
साहित्य- भिजलेला साबुदाणा दोन वाट्या, साबुदाण्याच्या बरोबरीने बारीक केलेले दाण्याचे कूट, थोडे जिरे, उकडलेला बटाटा कुस्करून पाव वाटी. शिजलेले वरई तांदूळ दोन चमचे, चवीनुसार मीठ, लाल तिखट.

प्रथम साबुदाणा, वरई, दाण्याचे कूट, बटाटा, मीठ, जिरे, तिखट सर्व साहित्य एकत्र करून मळावे. मळताना पाणी अजिबात घालू नये. मळलेले साहित्य तसेच ठेवावे. वडे करताना पाण्याचा किंचित हात लावून पुन्हा मळावे आणि प्लॅस्टीक कागदावर पातळ वडे थापून तेलात मंद आचेवर तळावेत. गुलाबी रंगावर तळून झाले की चांगले निथळावेत. हे वडे कुरकुरीत होतात आणि सहा सात दिवस टिकतातही. चटणीबरोबर अथवा नुसते खायलाही चांगले लागतात.

Leave a Comment