बिग बी, एकता कपूरकडे यंदा नाही दिवाळी उत्सव

फोटो साभार लाईव मिरर

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी दिवाळी निमित्त दिली जाणारी पार्टी हा दरवर्षी औत्सुक्याचा विषय असतो पण यंदा बिग बी यांच्या घरी दिवाळी साजरी केली जाणार नाही. त्याचबरोबर टीव्ही मालिका क्वीन एकता कपूर हिच्या कडेही यंदा दिवाळी पार्टी होणार नसल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे. यंदाच्या वर्षी करोना साथीमुळे दिवाळीचा जोश नेहमीप्रमाणे दिसत नसतानाचा बॉलीवूड उद्योगसुद्धा दिवाळीच्या मूड मध्ये नसल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनमुळे नवे चित्रपट प्रकाशित होऊ शकलेले नाहीत. थिएटर सुरु झाली तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद नाही शिवाय देशभर करोनाचे सावट अजूनही आहे.

बिग बी आणि एकता कपूर यांच्या कडे दिवाळी साजरी न करण्याचे कारण म्हणजे बॉलीवूड अभिनेते ऋषीकपूर यांचे निधन. ऋषी कपूर आणि बिग बी चांगले मित्र होते शिवाय बिग बी कन्या श्वेता हिचा विवाह ऋषी कपूर यांचे भाचे निखिल नंदा याच्यासोबत झाला असल्याने त्यांचे नाते आहे. त्यामुळे यंदा बीग बी यांच्याकडे दिवाळी नाही. एकता कपूरनेही ऋषी कपूर आणि तिचे वडील जितेंद्र हे जवळचे मित्र होते आणि दोन्ही कुटुंबातील नाते सलोख्याचे होते यामुळे दर वर्षी दिली जाणारी दिवाळी पार्टी यंदा रद्द केली आहे.

शिवाय बच्चन कुटुंबातील अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि नात आराध्या याना करोना संसर्ग झाला होता व त्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते त्यामुळेही यंदा घरात सण साजरा केला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.