केळे : आरोग्याचा खनिजा

bannana
आपल्या देशात उपलब्ध असलेल्या आणि वर्षभर कमी-अधिक प्रमाणात पण हमखास मिळणार्‍या फळांमध्ये सर्वाधिक पौष्टिक फळ कोणते असे विचारल्यास केळे हे त्याचे उत्तर पटकन मिळते. गरिबांना तर कमीत कमी किंमतीमध्ये जास्तीत जास्त पोषण द्रव्ये मिळवून देणारे फळ म्हणून केळांचाच उल्लेख केला जातो. मात्र केळात गोडी खूप असते आणि केळी जास्त खाल्ल्या तर जाडी वाढते. त्यामुळे एका बाजूला सर्वाधिक पोषण द्रव्ये पुरविणारे फळ म्हणून त्याचा उल्लेख होत असतानाच आहार तज्ज्ञ केळापासून सावध राहण्याचाही इशारा देत असतात.

केळाचे असे काही दोष असले तरी त्याचे किती तरी फायदे आहेत आणि ते फायदे आता वरचेवर लक्षात यायला लागले आहेत. त्याचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे केळे केवळ गोडच असते असे नाही तर त्यामध्ये साखरेचे, सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लुकोज हे तिन्ही प्रकार सामावलेले असतात आणि ते तंतूमय पदार्थांच्या सोबत शरीराला उपलब्ध होत असतात. त्यामुळे केळी खाल्ल्याबरोबर ताबडतोबच शरीराला चेतना मिळते आणि कमीत कमी वेळेत माणूस कार्यरत होतो.

दोन छोट्या केळी खाल्ल्याने माणसाच्या अंगामध्ये दीड तास कष्टाचे काम करण्यास उपयुक्त एवढी शक्ती प्राप्त होते. त्यामुळे जगभरातल्या खेळाडूंचे ते आवडते फळ आहे. शक्तीवर्धक फळ म्हणून ते खाल्ले जात असले तरी विविध विकारांमध्ये त्याचा औषधी म्हणून सुद्धा उपयोग होतो. विशेषत: मानसिक आजारांना केळी खाणे अधिक गुणकारी ठरत असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

1 thought on “केळे : आरोग्याचा खनिजा”

  1. सुभाष अभ्यंकर

    केले खाल्याने जाडी वाढते का?

Leave a Comment