काळे मिरे अनेक आजारांवर उपयुक्त

काळे मिरे मसाल्यात वापरले जातात. आणि आपल्याला त्याचा मसाला म्हणून असलेला उपयोगच माहीत आहे. काही लोक तिखटाला पर्याय म्हणून काळ्या मिर्‍याची पूड वापरतात. अनेक देशातल्या लोकांना काळ्या मिर्‍यांची औषधी गुणधर्मसुध्दा माहीत आहेत. परंतु मिरे जगभर पिकत नाहीत. भारतात ते मोठ्या प्रमाणावर पिकतात. त्यामुळे युरोप खंडातले व्यापारी भारतामध्ये मिरे मिळवून त्यांचा व्यापार करण्याच्या उद्देशाने आले होते. काळे मिरे आणि विलायची यांचे समभाग घेऊन त्यांची भुकटी केली तर ती भुकटी हागवणीवर चांगली गुणकारी ठरते. मिरे आणि जिरे यांचे काही गुणधर्म सारखेच आहेत. परंतु मिरे म्हणजे काळे मिरे हे अनेक पध्दतीने औषधी म्हणून उपयोगी ठरतात. मिर्‍याची पावडर कर्करोग विरोधी आणि पित्तविरोधी असते. पित्तामुळे पोटात भगभग होत असेल तर ती भगभग मिरे खाल्ल्याने थांबते.

मिर्‍याची पावडर पाण्याबरोबर घेतल्यास ती घेणार्‍याची भूकसुध्दा वाढते. डेंगी तापाला कारणीभूत ठरणार्‍या डासावर काळ्या मिर्‍याचा मारक परिणाम होतो. या डासांची अंडी मिर्‍यामुळे मरून जातात. आङ्ग्रिका खंडातील लोक अंगाच्या घामाला वास येऊ नये म्हणून मिर्‍याचा वापर करतात. म्हणून आता जगभरातले शास्त्रज्ञ मिर्‍याचा वापर डेंगी तापाच्या विरोधात कसा करता येईल यावर संशोधन करत आहेत. मिर्‍याला मसाल्यांचा बादशाह म्हणतात आणि भारतात मिर्‍याचे उत्पादन भरपूर होते ही गोष्ट ४ हजार वर्षांपासून सार्‍या जगाला माहीत आहे.

मिर्‍यामध्ये पायपॅरीन नावाचा घटक असतो आणि पायपॅरीनमुळे भूक वाढते. असा अनेक वर्षांपासूनचा अनुभव आहे. पायपॅरीनमध्ये ऍन्टीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्या गुणधर्मामुळे व्यक्तीच्या प्रकृतीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक प्रकारच्या सुधारणा होऊ शकतात. काळ्या मिर्‍यावर विशेषः त्यातील पायपॅरीनवर कॅन्सर प्रतिबंधक औषध म्हणून संशोधन करण्यात येत आहे. २०१० साली या संशोधनामधून असे दिसून आले की, पायपॅरीन हे शरीरातल्या काही कर्करोगांना कारणीभूत ठरणार्‍या जंतूंचा नायनाट करू शकते. याच वर्षी पायपॅरीनचे उपयोग जनावरांना काय होतील याचा पडताळा घेतला असता ते जनावरांनासुध्दा उपयुक्त असल्याचे आढळले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment