ऍरोमा थेरपीचे फायदे

aroma
ऍरोमा थेरपी ही संकल्पना मुळात भारतीय आहे. त्याला इंग्रजीमध्ये ऍरोमा थेरपी असे नाव रूढ झाले असले तरी मराठीतले तिचे मूळ नाव पुष्पौषधी उपचार पद्धती असे आहे. या उपचार पद्धतीत विशिष्ट फळे, त्यांच्या बिया, साली आणि मुळे यांचे सत्व किंवा अर्क काढून त्याचा वापर केला जातो. या उपचार पद्धतीतील औषधांमुळे आरोग्यावर तर चांगला परिणाम होतोच, पण मन:स्थिती सुद्धा सुधारते. त्यामुळे मानसशास्त्रज्ञ त्याचा वापर करतात.

ऍरोमा थेरपीचा वापर खालील विकारात केला जातो. पहिला विकार म्हणजे निद्रानाश. निद्रानाशामुळे अनेक विकार होऊ शकतात. डोकेदुखी, ऍसिडीटी, चिडचिडेपणा, थकल्याची जाणीव हे निद्रानाशाचे परिणाम आहेत. मात्र काही विशिष्ट पुष्पौषधी मुळे किंवा काही विशिष्ट वनस्पतींच्या तेलाने मसाज केल्यामुळे शांत झोप लागते. तणाव कमी होऊन मेंदूला आराम मिळतो.

ऍरोमा थेरपी ही प्रामुख्याने मनावरचा तणाव कमी करण्यासाठीच उपयुक्त असते. लेमन ऑईल, लव्हेंडर, बेर्गामोट, पेपरमिंट, वेटीवेर इत्यादी तेलांचा परिणाम मन:स्थितीवर चांगला होतो. एखाद्या व्यक्तीला अँक्झायटीचा विकार असतो, तो या तेलाने कमी होतो. काही तेलांमुळे नैराश्य कमी होत.

मुख्य म्हणजे ऍरोमा थेरपीने वेदना कमी होतात. काही महिलांना होणारा मासिक पाळीच्या काळातला त्रास कमी करण्यासाठी सुद्धा काही वनस्पतींची तेले वापरली जातात. ऍरोमा थेरपीने उच्च रक्तदाब सुद्धा नियंत्रणात ठेवता येते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment