ऍरोबिक व्यायाम सर्वात उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातल्या ङ्गॅटस्चे ज्वलन करण्यासाठी नेमका कोणता व्यायाम करावा याबाबत नेहमीच चर्चा चालते आणि चर्चेत सहभागी होणारे लोक आपापल्या परिने आपली मते व्यक्त करीत असतात. परंतु अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीना येथील काही संशोधकांनी वजन कमी करण्यासाठी ऍरोबिक व्यायाम सर्वाधिक उत्तम असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी या बाबत प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे काही निष्कर्ष काढले आहेत त्यासाठी बैठी कामे करणार्‍या २३४ स्त्री-पुरुषांच्या शरीरातील बदल न्याहाळले आहेत.

१८ ते ७० वर्ष या वयोगटातील या लोकांची नोंद घेतली आणि त्यांना ८ महिन्याचा ऍरोबिक अभ्यासक्रम पूर्ण करावयास लावले. त्यामध्ये ऍरोबिक ट्रेनिंग, रेझिस्टन्स ट्रेनिंग या दोन प्रकारच्या व्यायामांचा समावेश होता. या दोन्ही व्यायामांचे वेगवेगळे परिणाम नोंदण्यात आले तेव्हा असे आढळले. ऍरोबिक व्यायाम करणार्‍यांच्या हृदयाचे ठोके चांगले पडतात. हा व्यायाम आठवड्यातून तीन दिवस प्रत्येक दिवशी ४५ मिनिटे केला तरी चालते. त्यामुळे वजन कमी होते. अशाच प्रकारच्या अन्य व्यायाम प्रकारांनी स्नायूंना चांगला व्यायाम होतो, भूक चांगली लागते. परंतु वजन उतरण्याच्याबाबतीत त्यांचा ङ्गारसा उपयोग होत नाही. यातल्या २३४ लोकांच्या तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमा नंतरच्या वजनांची तुलना करण्यात आली. तेव्हा ऍरोबिक व्यायाम करणार्‍यांनी बरेच वजन गमावल्याचे आढळले.

त्या व्यतिरिक्त बॉडी मास इंडेक्स, कमरेचा घेर, हृदयाची अवस्था अशा अनेक चाचण्या घेण्यात आल्या तेव्हा असे दिसून आले की या सगळ्या निकषांवरसुध्दा ऍरोबिक व्यायाम करणार्‍यांनी अन्य व्यायाम करणार्‍यापेक्षा जास्त प्रगती केलेली आहे. वैशिष्ट्य म्हणजे ऍरोबिक व्यायाम रोज केलाच पाहिजे असे या तज्ञांचे म्हणणे नाही. परंतु आठवड्यातून किमान तीनदा तरी तो करावा असा त्यांचा सल्ला आहे. केवळ ऍरोबिकच नव्हे तर इतरही अनेक व्यायामांच्या बाबतीत असाच सल्ला असतो. व्यायाम रोजच केला पाहिजे असा नियम नाही. आठवड्यातून किमान तीन किंवा चार दिवस करावा असा डॉक्टरांचा नेहमीच सल्ला असतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment