इंटरव्ह्यूमधील सहजता

interview
इंटरव्ह्यूच्या बाबतीत आपण लक्षात ठेवायची आणि इंटरव्ह्यू घेणारे लोक आपल्याला सांगत नाहीत अशी एक गोष्ट आहे. ती म्हणजे इंटरव्ह्यूचे काही शास्त्र नाही आणि असले तरी इंटरव्ह्यू घेणार्‍यांना उत्तम इंटरव्ह्यू कसा घ्यावा याचे परिपूर्ण ज्ञान असतेच असे नाही. म्हणजेच इंटरव्ह्यू घेऊन उमेदवाराकडून त्याच्याविषयी जास्तीत जास्त माहिती कशी मिळवावी याचे तंत्र आणि शास्त्र सगळ्याच इंटरव्ह्यू घेणार्‍यांना माहीत असते असे नाही. त्यामुळे इंटरव्ह्यू देणार्‍या उमेदवारांनी मनावर ङ्गारसा दबाव येऊ न देता सहजतेने इंटरव्ह्यू दिला पाहिजे आणि असे उमेदवार यावेळी ज्या चुका करतात त्या चुका टाळल्या पाहिजेत. एखादी मुलाखत झाल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकांना धन्यवाद देणारे पत्र पाठविले पाहिजे. आपल्याला ती नोकरी मिळणार असो की नसो म्हणजेच आपण मुलाखतीत पास असो की नापास असो आपले एक पत्र गेले पाहिजे. त्यात आपल्याला मुलाखत देण्याची संधी दिली याबद्दल व्यवस्थापनाचे आभार मानले पाहिजेत. हा एक चांगल्या उपचाराचा भाग आहे.

त्याशिवाय आपल्या त्या कंपनीच्या त्या विशिष्ट नोकरीत रस आहे हेही त्यातून दिसून येते. अशा प्रकारच्या पत्रामध्ये केवळ धन्यवादाचा उपचार कोरडेपणाने पार पाडण्यापेक्षा इंटरव्ह्यूच्या दरम्यान निर्माण झालेल्या किंवा उपस्थित झालेल्या एखाद्या मुद्याची चर्चा करावी. काही वेळा असा मुद्दा किंवा आपल्या विषयीची विचारणा अचानकपणे झालेली असते. आपण तिच्याबाबतीत काही तयारी केलेली नसते. काही वेळा आपण एका पदासाठी म्हणून इंटरव्ह्यूला जातो आणि तिथे इंटरव्ह्यूच्या दरम्यान आपल्याला दुसरी एखादी जबाबदारी स्वीकारण्याची ऑङ्गर दिली जाते. अशा वेळी आपल्या दृष्टीने ती ऑङ्गर अनपेक्षित असल्याने आपण योग्य उत्तर देऊ शकलेलो नसतो. इंटरव्ह्यू संपल्यानंतर आपल्याला त्याची रुखरुख लागून राहते. अशा प्रकारचे अपुरे राहिलेले उत्तर आणि त्याविषयीचा खुलासा नंतर पत्रातून करावा. त्याचाही एक वेगळा परिणाम आपल्या विषयीच्या निर्णयावर होऊ शकतो. अशा रितीने पत्र लिहिण्यामध्ये आपला प्रांजळपणा तर व्यक्त होतोच परंतु आपला पोक्तपणाही दिसून येतो.

Leave a Comment