आफ्रिकन किम कार्दीशन बनणार फर्स्ट लेडी?

फोटो साभार डेली स्टार

सर्वाधिक मानधन घेणारी अशी प्रसिद्धी असलेली रीअॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दीशन इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली सेलेब्रिटी आहे. आफ्रिकेची किम कार्दीशन असे जिला म्हटले जाते ती योदोक्सी याओ मॉडेल असून तिच्या फिगर मुळे नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी मात्र वेगळ्याच कारणाने ती चर्चेत आली आहे. गिनी येथे होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीत ती प्रचार करणार आहे. पण विशेष म्हणजे हा प्रचार ती तिच्या नियोजित नवऱ्यासाठी म्हणजे मुसा संदीयना काबा याच्यासाठी प्रचार करणार आहे, मुसा ‘ग्रँड पी’ या नावाने प्रसिद्ध आहे.

या बातमीतील खरी कमाल पुढे आहे. मुसा आणि योदोक्सी यांची जोडी लोकांच्या चेष्टेचा विषय बनून राहिली आहे. योदोक्सी मॉडेल आहे तर मुसाला जन्मजात प्रोगेरिया हा आजार झाला आहे. या आजारात माणसाच्या शरीराची, उंचीची वाढ होत नाही. मुसाने फेसबुक पोस्टवर तो गिनी मधून राष्ट्रपती निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याने एक राजकीय पक्ष स्थापन केला आहे आणि गेल्याच महिन्यात मुसा आणि योदोक्सी यांच्या साखरपुड्याच्या बातम्या आल्या आहेत.

२०२० हे वर्ष काबा साठी चांगले राहिले आहे. या वर्षी त्याने दोन चित्रपटांना संगीत दिले आहे, त्याचा साखरपुडा झाला आहे आणि आता तो निवडणुकीत उतरत आहे. योदोक्सी हिने सुद्धा राजकारणात उतरण्याची घोषणा केली होती मात्र तिचा दावा फेटाळला गेला होता. त्यामुळे आता राष्ट्रपतीची पत्नी म्हणजे फर्स्ट लेडी बनणायचा तिचा मानस आहे. जानेवारीत हे दोघे लग्न करणार आहेत.