अर्जातली बनवाबनवीे

job
नोकरी मिळवण्यासाठी केल्या जाणार्‍या अर्जांमध्ये अनेकदा गङ्गलती सापडतात. काही उमेदवार एखादी जादाची माहिती देतात तर काही उमेदवार काही माहिती लपवतात. हजारो अर्जांमधून काही निवडक लोकांची निवड करताना कंपनीकडून अशा बनवा बनवीकडे थोड दुर्लक्ष होते. परंतु कालांतराने आणि कामाच्या ओघात सत्य उघडे पडतेच. बनवाबनवी करणार्‍या उमेदवारांना सुरूवातीला आनंद होतो परंतु नंतर मात्र त्याला शिक्षा मिळते. असे बरेच प्रकार आढळून आल्यामुळे आणि ही प्रवृत्ती वाढत चालल्यामुळे हिल ऍन्ड असोसिएटस् या कंपनीने या प्रकाराचा छडा लावायचे ठरवले आणि उमेदवार नेमकी कशी बनवाबनवी करतात आणि पुढे त्यांचे नेमके काय होते याचा छडा लावला. तेव्हा असे लक्षात आले की, बरेचसे कामगार आपल्या पूर्वीच्या नोकरीसंबंधी चुकीची माहिती देतात. बनवाबनवी करणार्‍या १०० अर्जांमध्ये ६४ अर्ज पूर्वीच्या नोकरीविषयीची खोटी माहिती दिलेले आढळले. १३ टक्के उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेविषयी खोटी माहिती दिली असल्याचे दिसून आले. अर्जावर आपला चुकीचा लिहिणारेही उमेदवार सापडले परंतु त्यांचे प्रमाण कमी होते. सध्या बड्या कंपन्यांमध्ये संदर्भ किंवा रेङ्गरन्स मागितला जातो. काही नोकरेच्छु उमेदवार संदर्भ म्हणून कोणाचेही नाव लिहितात परंतु त्यांनी ज्याचे नाव लिहिलेले आहे त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर उमेदवाराला ते ओळखत नाहीत असे आढळले. असे उमेदवार कोणत्या गोष्टी खोट्या सांगतात याचा छडा लावला असता असे दिसून आले की ४ टक्के उमेदवार ज्या संस्थेत नोकरीच केलेली नसते त्या कंपनीचे नाव पूर्वीचा अनुभव म्हणून सांगतात. काही उमेदवार आपले नोकरीचे खोटे रेकॉर्ड तयार करतात. काही उमेदवारांचे रेकॉर्ड बरोबर असते, कंपनीचे नाव खरे असते परंतु तिथे दोन वर्षे नोकरी केली तर तीन वर्षे केल्याचे प्रमाणपत्र आणलेले असते. अशा उमेदवारांना नंतर सत्य कळल्यावर नोकरीवरून काढून टाकले जातेच असे नाही. कारण ते नोकरीत रुळलेले असतात परंतु दरम्यान ते कर्मचारी संस्थेलाच नको असतील तर त्यांना कमी करण्यास हे एक चांगले कारण मिळते. परंतु तो कामगार चांगला असेल तर त्याला कसलीच शिक्षा केली जात नाही.

Loading RSS Feed

Leave a Comment