सुशांत आत्महत्या प्रकरणी ‘सीबीआय’ गप्प का? काँग्रेसचा सवाल


मुंबई: अभिनेता सुसंतासिंह राजपूत हत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग गप्प का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केला आहे. राजकीय दबावाखाली ‘सीबीआय’ने देखील बिहार निवडणूक होईपर्यंत स्वतःला ‘आचारसंहिता’ लागू करून घेतला आहे का, असा उपरोधिक सवालही काँग्रेसने केला आहे.

सुधांतसिंह प्रकरणी सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दवबाखाली सीबीआय मूग गिळून आहे का? या प्रकरणात दिल्ली येथील ‘एम्स’ संस्थेने सादर केलेल्या वैद्यकीय अहवालांबाबतही सीबीआय काही बोलत का नाही? बिहारचे तिन्ही टप्प्यातील मतदान पूर्ण होईपर्यंत त्यांना गप्प बसून देशभरातील नागरिकांना अंधारात ठेवण्याचे आदेश आहेत का, असे बोचरे सवाल करणारे सवाल प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी ट्विटरद्वारे केले आहेत.

‘एम्स’चा अहवाल येऊन २ महिन्यांचा काळ उलटला असूनही अजून सीबीआय त्यावर काही भाष्य करीत नसल्याबद्दल सावंत यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सीबीआय मोदी सरकारच्या दबावखहली गप्प आहे काय, असा सवालही त्यांनी केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी सीबीआयचा वापर करून घेण्यात आला, हे आता स्पष्ट झाले आहे. आता सीबीआयने या तपासाचे काय झाले हे सांगण्याबरोबरच आपल्या आरोपाचे खंडन करण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.

Loading RSS Feed