शत्रुघ्न सिन्हा यांनी केले पंतप्रधानांना लक्ष्य


नवी दिल्ली: एकेकाळचे भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा आणि ट्विटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपरोधिक टीकेचे लक्ष्य केले. ‘या जगात दोन माणसं शोधणं अशक्य आहे. एक म्हणजे मोदींचे वर्गमित्र आणि मोदींच्या हातून चहा घेतलेला ग्राहक,’ अशा अर्थाचे ट्विट त्यांनी केले आहे.

या ट्विटच्या पाठोपाठ आणखी एक ट्विट त्यांनी केले आहे. त्यामध्ये ‘ चूक ही पाठीसारखी असते. ती स्वतः:शिवाय इतर सगळ्यांना दिसते,’ असे नमूद केले आहे.थकविणाऱ्या रविवारी ही दोन ट्विट वाचा आणि हसा. हसणे प्रकृतीला चांगले असते, असेही सिन्हा यांनी म्हटले आहे.

शत्रुघ्न सिन्हा हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात केंद्रात मंत्री होते. १९९० ते २०१५ या काळात ते भाजपचे स्टार प्रचारक होते. मात्र, त्यांनी सन २०१५ मध्ये भाजपचा त्याग करून काँग्रेसच्या तिकिटावर बिहारच्या पाटणा येथून निवडणूक लढविली. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्यांचा पराभव केला.