भाजपबरोबर जाण्यापेक्षा राजकारण सोडू: मायावती


लखनौ: बहुजन समाज पार्टी कधीही कोणत्याही निवडणुकीत भारतीय जनता पक्षाबरोबर युती करणार नाही. जातीयवादी पक्षाबरोबर जाणे आम्हाला शक्य नाही. त्यापेक्षा आपण राजकारण सोडून निवृत्ती घेऊ, असे पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सांगितले.

‘सर्वजन; सर्व धर्म हिताय’ ही बसपाची विचारसरणी आहे. भाजप यांच्या बरोबर विरुद्ध विचारांवर चालणार पक्ष आहे. त्यामुळे भाजप, बसप एकत्र निवडणुका लढणे कधीही शक्य नाही, असे त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. धर्मांध, जातीयवादी आणि भांडवलदारी विचारांच्या पक्षांबरोबर आपण कधीही जाऊ हसकट नाही, असा दावा त्यांनी केला.

मागील आठवड्यातच मायावती यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवारांचा पाडाव करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. राज्यातील निवडणुणबरोबरच आगामी राज्यसभा निवडणुकीत सपाच्या उमेदरावांना पराभूत करण्यासाठी काहीही करू. कोणत्याही इतर पक्षाच्या उमेदवाराला मत देऊ. प्रसंगी भाजपच्या उमेदवाराला मतदान करू, असे त्या म्हणाल्या होत्या.