गिलगिट, बाल्टीस्तानचा ताबा सोडा: भारताचा पाकिस्तानला इशारा


नवी दिल्ली: गिलगिट- बाल्टीस्तान हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तानने बेकायदेशीर रीतीने या भूभागावर घेतलेला ताबा त्वरित सोडावा, असा इशारा पाक सरकारला दिला असल्याचे परराष्ट्र विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे.

गिलगिट- बाल्टीस्तानची स्वायत्तता काढून घेऊन हा पाकिस्तानातील एक प्रांत असल्याची घोषणा पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. त्यावर भारतीय परराष्ट्र विभागाने त्वरित प्रतिक्रिया देऊन पाकिस्तानने या भागाचा ताबा त्वरित सोडावा, अशी मागणी केली आहे.

पाकिस्तानने मागील ७० वर्षात या भागातील नागरिकांवर अन्याय केला आहे. या भागात होत असलेले मानवी हक्काचे उल्लंघन, नागरिकांची पिळवणूक आणि स्वातंत्र्याचा संकोच हे जगापासून लपून राहिलेले नाही. जम्मू, काश्मीर आणि लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाचाच गिलगिट आणि बाल्टिस्तान हा अबीभाज्या घटक आहे. मात्र, फाळणीनंतर पाकिस्तानने त्यावर बेकायदेशीर कब्जा केला आहे, असा आरोप भारताने केला आहे. भारताच्या प्रदेशाची स्वायत्तता काढून घेण्यासारखे उद्योग करण्यापेक्षा पाकिस्तानने या प्रदेशावरील ताबा सोडावा, अशी मागणी भारताने केली आहे.

Loading RSS Feed