कंगना राणावतची यूट्यूबर ध्रुव राठीवर आगपाखड; दिली तुरूंगात पाठवण्याची ताकीद


सध्याच्या घडीला अभिनेत्री कंगना राणावत ही प्रमाणाच्या बाहेर चर्चेत आहे. त्यातच ती सोशल मीडियावर जेव्हापासून आली आहे, तेव्हापासून तर ती जास्तच चर्चेत आहे. देश म्हणा अथवा परदेश म्हणा, प्रत्येक घडामोडीवर ती व्यक्त होत असते. त्यातच आता तिने प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीच्या त्या व्हिडीओवर आपले मत व्यक्त केले आहे. ज्यात बीएमसीकडून कंगनाचे ऑफिस तोडण्याबाबत त्याने चर्चा केली. ध्रुव राठीवर कंगनाने आरोप लावला आहे की, त्याने पैसे घेऊन व्हिडीओ तयार केला आहे.


दरम्यान एका पत्रकाराने एक ट्विट करत ध्रुव राठीचे नाव न घेता लिहिले होतं की, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावर त्यांच्या परिवाराची भूमिका आणि कंगनाला टार्गेट करणारे व्हिडीओ बनवण्यासाठी एका प्रसिद्ध यूट्यूबरने ६५ लाख रूपये घेतले.

या ट्विटवर प्रतिक्रिया देताना कंगनाने लिहिले की, व्हिडीओ बनवण्यासाठी या व्यक्तीला पैसे मिळतात. माझ्या घराबाबत मिळालेल्या बीएमसी नोटीसबाबत व्हिडीओत खोटे बोलण्यासाठी ती त्याला तुरूंगात पाठवू शकते. त्याला यासाठी ६० लाख रूपये मिळाले होते. त्याचबरोबर एखादी व्यक्ती सरकारचा पाठिंबा आणि पैसा मिळाल्याशिवाय कायद्याच्या प्रक्रियेवर अशाप्रकारे खुलेआम खोटे का बोलेल, असे देखील म्हटले आहे.


तत्पूर्वी त्या पत्रकारच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना ध्रुव राठीने लिहिले होते की, माझ्याबाबतची ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. पहिला मुद्दा म्हणजे मला कंगनावर व्हिडीओ करण्यासाठी कुणीही पैसा दिला नाही. दुसरा मुद्दा मी सुशांत सिंह राजपूतवर कोणताही व्हिडीओ करण्याचे प्लॅनिंग करत नाही आणि तिसरा मुद्दा जर माझी स्पॉन्सरिंग फी ३० लाख रूपये असती, तर मी किती श्रीमंत असतो.