गावस्करची टोपी, शास्त्रीचे कोचिंग किट लिलावात

फोटो साभार प्लेज टाईम्स

१९७१ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर भारताचे माजी क्रिकेट कप्तान सुनील गावस्कर यांनी घातलेली टोपी आणि राष्ट्रीय टीम प्रमुख रवी शास्त्री याचे कोचिंग किट ऑनलाईन होणाऱ्या एका लिलावात विकत घेण्याची संधी क्रिकेट प्रेमींसाठी उपलब्ध झाली आहे. क्रिस्टी तर्फे हा लिलाव केला जात असून त्याची सुरवात २७ ऑक्टोबर रोजी झाली आहे आणि तो १६ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.

क्रिस्टीने सर जॉफ्री बॉयकॉट यांच्या संग्रहातील काही वस्तू आणि टी २० चॅरीटी क्रिकेट संबंधित काही वस्तू या लिलावात विक्रीसाठी आणल्या आहेत. त्यात बॉयकॉट यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये १०० शतके पूर्ण करताना वापरलेली बॅट सामील असून तिला ३० ते ५० हजार पौड म्हणजे २९ ते ४८ लाख रुपये किंमत येईल अशी अपेक्षा आहे. यात मायकेल होल्डिंग यांचा एक शर्ट सुद्धा सामील असून होल्डिंग याने हा शर्ट बॉयकॉट ला शून्यावर आउट केले तेव्हा घातलेला होता. त्यावर होल्डिंग याची सही आहे.

सुनील गावस्कर यांनी इंग्लंड दौऱ्यावर जाताना वापरलेली टोपी यात सामील आहे. क्रिस्टीच्या दुसऱ्या लिलावात टी २० क्रिकेट इतिशासाशी संबंधित वस्तू विक्रीसाठी ठेवल्या गेल्या आहेत.