म्हणून प्रिन्स विलियम्सचा करोना संसर्ग ठेवला होता गुप्त

फोटो साभार इंडिया टुडे

ब्रिटन राजघराण्यातील प्रिन्स विलियम्स याला ही एप्रिल महिन्यात करोना संसर्ग झाला होता मात्र त्याचा रिपोर्ट गुप्त ठेवला गेला होता. आता मात्र प्रिन्स विलियम्सने त्याबाबत खुलासा केला आहे. केसिंग्टन पॅलेसच्या हवाल्याने हे वृत्त दिले गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल २०२० मध्येच जेव्हा विलियम्स याचे वडील प्रिन्स चार्ल्स याना करोना संसर्ग झाला तेव्हाचा प्रिन्स विलियम यांचाही करोना चाचणी अहवाल पोझिटिव्ह आला होता. देशाचे प्रंतप्रधान बोरीस जॉन्सन मार्च अखेरीच करोना पोझिटिव्ह झाले होते आणि त्यांच्यावर आयसीयु मध्ये उपचार सुरु होते. देशाची अडचणीची परिस्थिती लक्षात घेऊन विलियम्स यांच्या रिपोर्टबाबत गुप्तता पाळली गेली इतकेच नव्हे तर त्याच्यावर काय उपचार केले गेले याचीही माहिती जाहीर केली गेली नव्हती.

ताज्या अहवालात ड्यूक ऑफ केम्ब्रिज, प्रिन्स विलियम्स करोना पोझिटिव्ह आल्यावर त्याला व त्याच्या कुटुंबियांना अनमेर हॉल येथे आयसोलेशन मध्ये ठेवले गेले होते. या काळात विलियम्स यांनी फोन आणि व्हिडीओ कॉल करण्याचे काम सुरु ठेवले होते. हवेलीतील डॉक्टर्सनी त्यांच्यावर या काळात उपचार केले आणि करोना संदर्भातील सर्व सरकारी आदेशांचे कटाक्षाने पालन केले गेले होते. देशात या काळात महत्वाच्या घडामोडी घडत होत्या त्यात या काळजीची भर पडू नये म्हणून विलियम्स याना करोना झाल्याची बातमी दिली गेली नाही असा खुलासा केला गेला आहे.

Loading RSS Feed