मेड इन चायना ट्रम्प फोटो मास्कची तडाखेबंद विक्री

यंदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून जो बायडेन याची निवड होईल असे अनेक सर्व्हेक्षणातून सांगितले जात आहे. मात्र आश्चर्याची बाब अशी की ट्रम्प यांच्यासाठी बनविलेल्या निवडणूक प्रचार सामग्रीची सर्वाधिक विक्री होताना दिसते आहे. त्यातही मेड इन चायना डोनल्ड ट्रम्प मास्क, टोप्या, मग्स, बॅनर्स यांची तुफान विक्री होत आहे. अमेरिकन अध्यक्ष निवडणुकीत ३ नोव्हेंबरला मतदान होत असून साऱ्या जगाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

डोनल्ड ट्रम्प यांनी या निवडणुकीत चीन अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू आहे या प्रचारावर भर दिला आहे मात्र त्यांचे प्रचार साहित्य चीनच्या यीवू शहरातील ठोक बाजारातून विकले जात आहे. येथील कारखान्यात काम करणारे कामगार म्हणतात ट्रम्प यांच्या फोटोचे मास्क, टोप्या केवळ अमेरिकेत नाही तर चीन मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर विकल्या जात आहेत. येथील १०० दुकानांपैकी एका दुकानदराने बायडेन यांच्या फोटो साठी वर्षभरात फक्त एकच ग्राहक आल्याचे सांगितले आहे.

२०१६च्या निवडणुकात हिलरी क्लिंटन यांचे बॅनर, फोटो घराघरातून लागले होते. या वर्षी ट्रम्प यांचे लागले आहेत. काही घरात ट्रम्प आणि बायडेन या दोघांचेही बॅनर आहेत. म्हणजे पती पत्नीची उमेदवार निवड वेगळी आहे. आकडेवारीनुसार यंदा ६५ वर्षाच्या पुढील मतदारांपैकी २/३ मतदारांनी अगोदरच मतदान केले आहे. ३ नोव्हेंबर रोजी अधिकाधिक मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करणे ट्रम्प यांच्यासाठी गरजेचे आहे असे मानले जात आहे.