मातृत्व मिळताना घ्यावयाची काळजी

pregnancy
कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यामध्ये मातृत्व प्राप्त होणे ही एक अनोखी घटना असते. परंतु माता होताना स्त्रियांनी काही पथ्ये पाळण्याची गरज असते. कारण तिला माता झाल्यानंतर काही जबाबदार्‍या येऊन पडत असतात. जर ती माता सतत आजारी पडत असेल तर ती त्या जबाबदार्‍या कशा पार पाडू शकेल? बर्‍याच महिला आपल्या आरोग्याच्या बाबतीत म्हणाव्या तेवढ्या दक्ष नसतात. त्यांना आपल्या प्रकृतीची हेळसांड परवडणारे नाही. म्हणूनच माता झालेल्या आणि होणार्‍या स्त्रियांनी खालील पथ्ये पाळली पाहिजेत.

१) आरोग्यदायी आहार – मातेला केवळ स्वत:चेच नाही तर आपल्या कुटुंबाचेही आरोग्य चांगले राहील याबाबत काळजी घ्यावी लागते. या आहारामध्ये फळे आणि भाजीपाला यांचा मोठा समावेश असला पाहिजे. मुलांचा आहार सुद्धा फळांनी युक्त असला पाहिजे, पण स्वत: मातेलाही फळांचा आहार केला पाहिजे.

२) चालते-हलते रहा – निरोगी आयुष्य जगण्यासाठी मातेला सतत हलते-चालते राहिले पाहिजे. कष्टाची कामे केली पाहिजेत. एका जागी बसून रहाता कामा नये. अन्यथा तिच्या शरीरावर चरबी वाढत जाते. त्यातूनच रक्तदाब आणि मधूमेह असे विकार जडतात. ३) मातेला चांगली झोप मिळण्याची गरज असते. अन्यथा हृदयाचे विकार जडण्याची शक्यता असते. कोणत्याही प्रौढ व्यक्तीने किमान ७ ते ८ तास झोप घेतली पाहिजे.

४) तणावाचे व्यवस्थापन – लहान-मोठा ताण-तणाव हा आयुष्यातला अपरिहार्य भाग असतो. तो टाळता येत नाही. परंतु जेव्हा तणाव गंभीर स्वरूपाचा असतो तेव्हा त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. त्याचे व्यवस्थापन केले पाहिजे, तो टाळला पाहिजे. ५) सर्वात महत्वाचे म्हणजे प्रकृतीच्या बाबतीत कसलीही जोखीम घेता कामा नये. वारंवार तपासण्या केल्या पाहिजेत आणि आपल्या पूर्वजांचा आरोग्याच्या बाबतीतील इतिहास आपल्याला माहीत पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment