मत्स्य व्यवसायाला मोठी संधी

fishing
सगळेच शेतकरी मत्स्य व्यवसाय करू शकत नाहीत. मत्स्य व्यवसाय हा समुद्रात करायचा व्यवसाय आहे आणि मच्छीमार लोक तो व्यवसाय परंपरेने करत आलेले आहेत. त्यामुळे सर्वसाधारण शेतकर्‍यांना हा व्यवसाय करणे शक्य नाही. असे असले तरी नैसर्गिक तळी, तलाव, पाझर तलाव आणि धरणांची जलाशये यांच्यातही मत्स्य व्यवसाय करणे शक्य झालेले आहे. सरकार आणि शेतकरी यांचे या गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाकडे म्हणावे तेवढे लक्ष नाही. देशामध्ये होणार्‍या एकूण मत्स्य व्यवसायात गोड्या पाण्यातील आणि शेतकर्‍यांनी करावयाच्या मत्स्योत्पादनाचे प्रमाण वाढवण्यास भरपूर वाव आहे. परंतु ते प्रमाण म्हणावे तेवढे वाढत नाही. ते वाढवल्यास शेतकर्‍यांना मत्स्य व्यवसाय आणि कोळंबी संवर्धन हा व्यवसाय विकसित होऊ शकतो. ुपंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात शेतकरी आणि मच्छिमार यांव्या जीवनात बदल करण्याचा निर्धार केला असल्याने येत्या काही दिवसांत या दोन व्यवसायात सरकारची मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता वाढली आहे.

कितीही झाले तरी ही सारी जलाशये सरकारी मालकीची असतात आणि त्यात मत्स्य व्यवसाय करणे, त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळणे या गोष्टी सरकारच्या स्वाधीन असतात. शेतकर्‍यांना त्यात ङ्गारसे स्वातंत्र्य मिळत नाही. परंतु शेतकर्‍यांना आता आपल्या मनाप्रमाणे मत्स्य व्यवसाय करता येईल, अशी एक सोय उपलब्ध होणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये शेततळी निर्माण करण्याची मोठी मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या शेतांमध्ये शेततळी तयार होत आहेत. सरकार त्याला भरपूर मदतही करत आहे. शेततळ्यांमुळे पाण्याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर सुटत आहेच. पण ज्यांच्या शेतात शेततळी तयार केली जात आहेत त्यांना त्या शेततळ्याच्या रुपाने मत्स्य व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शेताला पाण्याचा पुरवठा आपल्या मनाप्रमाणे करता यावा यासाठी नाही तरी तळ्यातले पाणी साठवून ठेवले जातेच. परंतु ते पाणी उगाच साठवण्यापेक्षा त्यात जर माशांची अंडी सोडली तर जेवढा काळ पाणी साठवले जात असेल तेवढा काळ आयताच मत्स्य व्यवसाय होऊन जातो. शेततळ्यात पाणी असेपर्यंत अशी मत्स्य शेती करावी आणि पाण्याचा वापर संपून आता शेततळे मोकळे करण्याची पाळी आली आहे असे वाटले की, आहेत तेवढे मासे काढून विकून टाकावेत आणि तळे मोकळे करावे. पुढच्या वर्षी पुन्हा शेततळ्यात पाणी आले की, नव्याने पुन्हा माशांची अंडी विकत आणावीत आणि पाण्यात सोडून द्यावीत. पुन्हा पाणी असेपर्यंत नवा मत्स्य व्यवसाय होऊन जातो आणि पाण्याच्या संकटातून मुक्तता होण्याबरोबरच एक जोडव्यवसाय शेतकर्‍याला उपलब्ध होतो. मत्स्य व्यवसायाला ङ्गारसा खर्च येत नाही. काही प्रमाणात माशांसाठी खाद्य टाकावे लागते. त्याशिवाय मासे शेवाळ खाऊन सुद्धा जगतात.

मासे पाण्यात जगत असले तरी त्यांना ऑक्सिजनची गरज लागत असते आणि तशी सोय करण्याचे काही उपाय आहेत त्यांची माहिती करून घेतली की, सामान्य शेतकरी सुद्धा शेततळ्याच्या जोरावर उत्तम मत्स्य शेती करू शकतात. मासे हे बर्‍याच लोकांचे खाद्य असल्यामुळे मासे विकण्याची काही अडचणही येत नाही. खरे तर आपल्या देशाला तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. तामिळनाडू, केरळ, ओरिसा, प. बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, पॉडिचेरी, गुजरात, या राज्यांना विस्तृत समुद्र किनारा लाभलेला आहेे. समुद्रातल्या पाण्यात अनेक प्रकारचे जलजीव आहेत पण त्यांचा अजूनही आपल्याला माग लागलेला नाही. समुद्राच्या पोटात आपण फारतर १०० मीटर खोलीपर्यंत पोचलो आहोत. समुद्राची खोली त्यापेक्षा किती तरी जास्त आहे. त्याची कमाल खोली ६ किलो मीटर आहे. त्या खोलीपर्यंत जाण्याचा प्रतत्न केला तर आपल्याला फार मोठा खजिना सापडणार आहे. तसे प्रयत्न जारी आहेत आणि येत्या काही वर्षात हा खजिना आपल्याला हस्तगत करता येईल असे संशोधन करण्यात येत आहे.

44 thoughts on “मत्स्य व्यवसायाला मोठी संधी”

 1. माज्याकडे 1एकर ची 3 तळी आहे मला मच्छी.पालन करायच आहे कुणी तरी माहिती सांगा आणि बी कुठे मिळेल ते सांगा

 2. Sangramsingh Mohite

  मला मत्स्यव्यव्साय बद्दल माहीती पाहीजे आहे.
  क्रुपया मला देणे.

 3. मला मत्स्यव्यव्साय बद्दल माहीती पाहीजे आहे.
  क्रुपया मला देणे.

  9860719729

 4. sir mi ishvar dhangar sir mala fish farming badal mahiti sagvi prashishan kothe kase milel yachi mahiti dya sir maza mo 7875065612

 5. Matsutpadanabaddal shastriy mahiti agadi vina mobadala sopya bhashet milel. . Prashant Jadhav Sir . contact . 9763530222

 6. मला मत्स्यव्यव्साय बद्दल माहीती पाहीजे आहे.
  क्रुपया मला देणे.

 7. मला मासेपालन करायचे आहे ग्रामपंचायत च्या जागेवर कारर कसा करायचा आणि मासे पालनासाठी शासना कडुन काही मदत होऊ शकते का मासे पालनाचे ट्रेनिंग कूठे मिळेल
  Plz sir give me information
  Mob no. 9763528711

 8. दादाराव पाटील

  सर मला मत्स्यपालन व्यवसाय करायचा आहे .(मत्स्यपालन) संबधीत पुस्तक संपुर्ण मराठीत माहिती मिळेल असे पुस्तकाचे नांव काय व ते कुठे मिळेल. वरील नमुद विषया संबधी माहिती मिळेल अशी आशा करतो मो.न. ८७६७४८२००७

 9. दादाराव पाटील

  सर मला मत्स्यपालन व्यवसाय करायचा आहे .(मत्स्यपालन) संबधीत पुस्तक संपुर्ण मराठीत माहिती मिळेल असे पुस्तकाचे नांव काय व ते कुठे मिळेल. वरील नमुद विषया संबधी माहिती मिळेल अशी आशा करतो

 10. सुभाष शिंदे

  मश्य पालनासाठी शेत तळ्यातील पाणी बदलत नसेल तर चालेल का आणि कीती दिवस चालेल. माहिती पाहिजे आहे 9657626625

 11. सुभाष शिंदे

  मश्य पालनासाठी शेत तळ्यातील पाणी बदलत नसेल तर चालेल का आणि कीती दिवस चालेल. माहिती पाहिजे आहे

 12. मला मत्स्यव्यव्साय बद्दल माहीती पाहीजे आहे.
  क्रुपया मला देणे.

  9762427163

 13. sadhyachi shetichi avastha baghitli tr sheti kamasathi majur tasech khte biyane aani etr kharch lakshat gheta aaplyla khup nuksan hot aahe

  parntu jr aapn aaplya shetamdhe talav karun matsy sheti keli tr aaplyala mothya pramanat nafa milu shakto yacha anubhav me swata ghetlela aahe . aani sadhyabmaza godya panyatil matsy sheti ha vyvsay uttam nafyane chalu aahe .

 14. matsutpadanabaddal shastriy माहीती मिलेल . . . Contact- harish phadke sir- 9975303160

 15. संदेश कुडतरकर

  नमस्कार,
  मी प्रामुख्याने कोकणात मत्सशेती करण्यास उत्सुक आहे. माझ्याजवळ नदी शेजारी सुमारे २ एकर जमीन आहे. गोड्या पाण्यात कोणत्या प्रकारचे मासे संवर्धन करू शकतो याबाबत कृपया माहिती द्यावी.

  संपर्क क्रमांक : ८८२८३८९६८१

 16. Please send me information about fish rich in Maharashtra state.Also in Marathi language.Thank you.

 17. राकेश तू मोरे

  मला मत्स्य शेती ची खुप आवड आहे मी खदान मधे कोलंबि(झींगे)मासे टाकून त्यांना कसे वाढवायचे त्यांना जर नडाचे पानी दिले तर चालेल का पानी किती दिवसात change करावे 100×100 चे तलावमधे किती मासे सोडॉवे खाद्य काय टाकावे व दिवसाला किती टाकावे
  फोन नं.8390838355

 18. पंडित दत्ताञय पाटील

  मला मत्स्यव्यव्साय बद्दल माहीती पाहीजे आहे.
  क्रुपया मला देणे.

 19. पंडित दत्ताञय पाटील

  मला मत्स्य व्यवसाया बदल माहीती पाहिजे. मी शेततळे मध्ये सुरू केले आहे

 20. नितीन गुणवंत जगताप

  मासे पालन विषयावर मार्गदर्शन पाहिजे विहिरीतील मासे पालन

 21. नितीन गुणवंत जगताप

  मला विहीरीत मासे पालन करायचे आहे तरीमागॅदशॅन पाहिजे

 22. 48×28 meter ani 14 feat height che ek fish pond Tayar kele ahe..ha pond me Sangam, tal-murbad,Dist-Thane, yethe Tatar kela ahe. Tyat mala Katla ,rahu,mrugal,scampi(kolambi) sodaychi ahe…..mala pudhil pramane mahiti awashak ahe….1) Ha pond me SWA kharchane tayar kela ahe….tari mala government kadun kahi help kivha subsidie milu shakte ka ani kashi…..
  2) sadharan kiti fish sodu shakto….
  3)tyanna feed ani medicine kuthle lagtil
  4) suppliers and purchaser.
  Ajay- 9594760212,9004236339,9222086980

 23. विकास करंडे

  मला मसे पालन करय्चे आहे आप्ले मार्गदर्शन पहीजेन माझी शेती आहे मला व्यवसाय करायला आवडल माझा पत्ता मु . काठापुर तालुका. आंबेगाव जिल्हा पुणे
  मोबाईल. 9702897048

 24. सतीश विश्वकर्मा (CEO)

  मत्स्यशेती, मत्स्य अन्न व मत्स्यबीज करिता व मत्स्यसंवर्धनासाठी लागणारी बहुमुल्य व उत्कृष्ठमाहिती साठी संपर्क साधा
  युनायटेड एक्वाकॅल्त्चर शोल्युसन ग्रुप
  (मुंबई)
  ०२५१ ६५१३८८४
  वेबसाईट: http://www.uasgroup.weebly.com
  ई-मेल: uasgroup@uasgroup.co.in

 25. वाखुरे हरिभाउ

  मला पान्याचि चागलि सोय आसल्याने मि मस्य पालना च्या व्यासायाला सुरवात करायचि आहे मार्गदर्शन हव आहे
  मो. 7249063912

 26. दिगंबर खरात

  मला ३०एकर शेती ला पुरेल एवढे शेत तळे करायचे आहे.किती आकारमान पाहिजे ? विशेषत: पाषान दगड जमिन आहे .त्यात मत्स पालन देखिल करायची ईच्छा आहे. मार्गदर्शन करा ही आग्रहाची विनंती. मो नं ९४२१९७८९९६

 27. विश्वास वायदंडे

  मला ग्रामपंचायत च्या जागी करार कसा करायचा आणि शासना कडुन त्याला काही अनुदान आहे का मासे पालना विषयी ट्रेनिंग कूठे मिळेल मोबाईल no 9158991931

 28. विश्वास वायदंडे

  मला मासेपालन करायचे आहे ग्रामपंचायत च्या जागेवर कारर कसा करायचा आणि मासे पालनासाठी शासना कडुन काही मदत होऊ शकते का मासे पालनाचे ट्रेनिंग कूठे मिळेल

 29. Dear sir,

  Please share me… Fish plant more information. My mobile number 8007773847

  Thanks you
  Santosh Shivankar

 30. औरंगाबाद शहर जवळ माझी 5000 sq ft जागा आहे,व् पानी मुबलक प्रमाणात आहे, मला मासेपालन विषयी मार्गदर्शन करा मोबाइल न, 9404679445

 31. सुरेश मोरे

  मला मत्स्य पालन विषयी माहिती पाहिजे शेततळ्यामध्ये मत्स्य व्यवसाय करायचा आहे माझाwhatsapp no 9096601650

 32. माहिती पाहिजे आसेल तर वाँटसअप ला मेसज करा…९९७०४१९३१८

 33. चेतन मधुकर रेडकर

  मला मत्स्यव्यव्साय बद्दल माहीती पाहीजे आहे.
  क्रुपया मला देणे.

 34. निलकमल सुधीर धालपे.

  मत्स्य शेती साठी तुमचे काही अनुदान असते का व तुम्ही काही गाईडन्स देता का. माझे शेततळे तयार आहे.

 35. pradip hire from navapur ndb

  शेत तळे भाडे कराराने घेतले तर त्या मत्स्यशेतीतून मिळणारे उत्पन्न हे ज्याने करारा घेतले आहे त्याला टेक्स फ्री असते का ?
  मी स्वता शेत तळे भाडे कराराने घेतोय म्हणुन हा प्रश्न वीचारतोय

 36. बाबुराव कृष्णा कुंभार

  मला मत्स्य व्यवसाया बदल माहीती पाहीजे आहे .

Leave a Comment