बदक पालन व्यवसाय

duck
बदक पालन व्यवसाय हा महाराष्ट्रातला एक उपेक्षित व्यवसाय आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या कोंबडी पालनाचा व्यवसाय चांगल्यापैकी मूळ धरायला लागला आहे. परंतु बदक पालनाच्या बाबतीत अजून म्हणावी तेवढी जागृती निर्माण झालेली नाही. साधारणपणे दमट हवामानामध्ये हा व्यवसाय केला जातो. समुद्र किनार्‍यालगत किंवा ज्या भागात भाताचे पीक जास्त होते अशा भरपूर पाऊस पडणार्‍या भागामध्ये बदक पालन चांगले करता येते. म्हणजे कोकण हा भाग बदक पालनासाठी अनुकूल आहे. त्याचबरोबर चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यातही बदक पालन करायला काही हरकत नाही. बदकाच्या पालनात कोंबडी पालनापेक्षा काही जास्त ङ्गायदे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बदकांना कोंबडीपेक्षा कमी खाद्य लागते. बदकाचे पालन पिंजर्‍यात न करता साचलेल्या किंवा साचवलेल्या पाण्यात केले जात असल्यामुळे त्यांना पाण्यातच बरेचसे खाद्य सापडते.

कोंबडीपेक्षा बदकांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते आणि बदकांची अंडी देण्याची क्षमताही जास्त असते. बदकाची मादी कोंबडीपेक्षा वर्षाला ४० ते ५० जास्त अंडी देतात, शिवाय बदकाचे अंडे कोंबडीच्या अंड्यापेक्षा १५ ते २० ग्रॅम जास्त वजनदार असते आणि त्यामध्ये कोंबडीच्या अंड्यापेक्षा अधिक पोषक द्रव्ये असतात. कोंबडीच्या आयुष्यामध्ये अंडी द्यायला सुरुवात केल्यानंतर दुसर्‍या वर्षी अंडी कमी व्हायला लागतात. परंतु बदकांच्या बाबतीत मात्र तसे होत नाही. बदक पालन करण्यासाठी पिंजरा किंवा जाळीच्या कुंपणाचे घर करावे लागतेच, परंतु बदकांना दिवसभर ङ्गिरायला जवळपास जलाशय असावा. नदी, नाला, छोटे तलाव किंवा सरोवर असल्यास त्यांच्या ङ्गिरण्याची आयतीच सोय होते. अशी कसलीही सोय नसताना बदल पालन करायचे असेल तर कृत्रिम जलाशय तयार करावा लागतो. असा जलाशय सहा ङ्गूट व्यासाचा आणि सव्वा ङ्गूट खोलीचा असावा. त्यात बदकांना ङ्गिरता येते. बदकांना सरोवर किंवा जलाशय केवळ ङ्गिरण्यासाठी हवा नसतो, तर त्याला त्या पाण्यात डोके बुडवता आले पाहिजे. तेवढी त्या पाण्याची खोली असली पाहिजे.

त्या जलाशयाचा आकार पाळावयाच्या बदकांच्या संख्येनुसार ठरवावा. तसेच घरांचा आणि जाळीच्या कुंपणाने बंद केलेल्या घरट्याचा आकार ठरवताना सुद्धा तो बदकाच्या संख्येनुसार असावा. बदक पालनाचे सगळ्यात मोठे पथ्य म्हणजे नियमित पाणी पुरवठा, हिरवे गवत यांची उपलब्धता असावी. बदकांच्या पिलांचे संगोपन काळजीपूर्वक करावे लागते. त्यांच्या वाढीच्या काळामध्ये काही विशिष्ट तपमान असणे आवश्यक असते. पहिल्या महिन्यामध्ये ते २८ ते ३२ अंश सेल्सियस असावे. नंतरच्या काळात ते हळु हळु कमी केले तरी चालते.

6 thoughts on “बदक पालन व्यवसाय”

  1. हा व्यावसाय कसा सुरू करायचा याबद्दल माहीती हवी आहे

  2. मनोज भगवान सुयऱवंशी

    मला बदक पालन करायचे आहे ।
    तरी त्याच्याविषयी मला माहीती द्यावी।

  3. Rahul Patil Thanekar

    मला बदक पालन करायचे आहे कोठे संपर्क करावा

  4. धनंजय विलास मोडक

    मला बदक पालन हा व्यवसाय करायचा आहे.ते कुठे मिळतात.त्यांचा सेल कसा होतो.याची माहिती हवी होती.

Leave a Comment