चिमण्यांचे आवाज अचूक ओळखणारे सॉफ्टवेअर

chimani
विविध पक्षांचे आवाज अचूक ओळखणारे व त्यातही विविध जातीच्या चिमण्यांचे वेगवेगळे आवाज अचूक ओळखून चिमण्यांची जात सांगू शकणारे सॉफ्टवेअर वैज्ञानिकांनी तयार केले आहे. या साठी विविध जातीच्या चिमण्यांचे तसेच पक्ष्यांचे आवाज त्यात रेकॉर्ड करण्यात आले आहेत. हे रेकॉडींग ऐकून सॉफ्टवेअर संगणकाच्या मदतीने चिमण्यांची ओळख पटवू शकते.

फिचर लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून हे सॉफ्टवेअर तयार करणारे डॉ. डेन स्टोवेल म्हणाले चिमण्यांचे आवाज म्हणजे नुसता चिवचिवाट वाटत असला तरी प्रत्यक्षात चिमण्यांचे गाणे फारच जटील असते. त्यांचा सर्वसाधारण आवाजही अतिशय जटील असतो कारण ऐकताना तो एकसारखा वाटतो. हे सॉफ्टवेअर हे आवाज वेगवेगळे ओळखू शकते. त्यासाठी हजारो चिमण्यांच्या आवाजांवर प्रयोग करण्यात आले आहेत. यापुढे आता दोन कबुतरांतील नाते नक्की कशा प्रकारचे असते हे ओळखण्यासाठीचे सॉफटवेअर तयार करण्याचे काम स्टोवेल यांनी हाती घेतले आहे.

Leave a Comment