इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी केली दुसऱ्या लॉकडाउनची घोषणा


लंडन – युरोप, अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट आली असून फ्रान्सने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आता इंग्लंडनेही लॉकडाउनची घोषणा केली आहे. दुसऱ्या लॉकडाउनची पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी घोषणा केली आहे. कोरोनाचा थंडीमध्ये वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान इंग्लंडमध्ये पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी दुसरा लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउनमध्ये हॉटेल, दुकाणे आणि सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात येणार आहेत.


ही माहिती बोरिस जॉनसन यांच्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत दिली आहे. या व्हिडीओत लॉकडाउनदरम्यान घरातच राहण्याची विनंती करण्यात आली आहे. चार आठवड्यानंतर परिस्थिती पाहून लॉकडाऊन संपवायचा किंवा वाढवायचा या निर्णय घेतला जाईल, असेही ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता कोणत्याही कारणास्तव घरातून बाहेर निघू नये. शक्य असल्यास घरुनच काम करावे. गरज नसल्यास प्रवासही टाळा, अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे.