मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर रोहित पवारांनी साधला केंद्रीय रेल्वे मंत्र्यावर निशाणा


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्यामुळे देशाची आर्थिक राजधानीची लाईफ लाईन असलेली लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. पण लोकल सुरू करण्यास रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक उशीर करत असल्याचा आरोप राज्य सरकारने केला आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे. मुंबईतील लोकल सुरू करण्याच्या मुद्द्यावरुन आमदार रोहित पवार यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे.


श्रमिकरेल्वेबाबत राज्य सरकारने तपशील दिला नाही,असं tweet मध्यरात्री करण्याची तत्परता दाखवणारे रेल्वेमंत्री लोकल सुरु करण्याच्या पत्रावर चार दिवस उलटले तरी निर्णय घेत नाहीत,याचं आश्चर्य वाटतं.तर स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक अशा सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात जातात, अशी खोचक टीका भाजपवर केली आहे. त्याचबरोबर मुंबई लोकल सुरु करण्यासंदर्भात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना रोहित पवार यांनी श्रमिक रेल्वेबाबत त्यांनी केलेल्या ट्विटची आठवण करुन दिली.